Headlines

विधान परिषदेचं काय ठरलं होतं सूत्र? अर्जुन खोतकरांनी आतली गोष्ट सांगून भाजपला तोंडघशीच पाडलं

विधान परिषदेचं काय ठरलं होतं सूत्र? अर्जुन खोतकरांनी आतली गोष्ट सांगून भाजपला तोंडघशीच पाडलं
विधान परिषदेचं काय ठरलं होतं सूत्र? अर्जुन खोतकरांनी आतली गोष्ट सांगून भाजपला तोंडघशीच पाडलं


अर्जुन खोतकर, विधान परिषद निवडणूकImage Credit source: एजन्सी

Arjun Khotkar on Legislative Council Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अजून एका जागेवर शिवसेना आग्रही आहे. अर्जुनराव खोतकर यांनी मुलगा अभिमन्यू खोतकर याच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काही कामासाठी ही भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली असली तरी राष्ट्रवादीची मतं आपल्या खात्यात यावी यासाठी ही भेट महत्त्वाची असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता खोतकर यांनी भाजपला आरसा दाखवला आहे.

ही जागा आमचीच

ज्याची जागा त्याची जागा, ज्याचा आमदार त्याची जागा आधी असंच सूत्र ठरलेलं होतं. ही जागा आम्हाला सुटलीच पाहिजे आमचाच हक्क आणि आमचाच अधिकार आहे. विधान परिषद निवडणुकीवरून आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दणका दिला आहे. भास्कर आंबेकर यांच्यासाठी ही जागा मी पक्षाकडे मागितलेली आहे. याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे ते म्हणाले.

ही जागा शिवसेनेचीच आहे. आमचे अंबादास दानवे त्यावेळी निवडून आलेले होते. त्यामुळे ती जागा आमचीच आहे. त्यामुळे जागा सोडून घेण्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी देखील या जागेवर दावा केला असल्याचा पाहायला मिळाले. आधी असंच सूत्र ठरलेलं होतं, ज्याची जागा त्याची जागा, ज्याचा आमदार त्याची जागा याकडे त्यांनी भाजपचे लक्ष वेधले. जालना विधान परिषद प्रतिनिधित्व मिळेल का या प्रश्नावर बोलताना ही जागा आम्हाला सुटलीच पाहिजे आमचाच हक्क आणि आमचाच अधिकार आहे. भास्कर आंबेकर यांच्यासाठी ही जागा मी पक्षाकडे मागितलेली आहे, याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे खोतकर म्हणाले.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा

श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत आणि युवा नेतृत्व फार जोमाने पुढे येत आहे. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा शिवसंवाद या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणं हे नियोजन आखलं आहे, अशी माहिती अर्जुनराव खोतकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेना ज्या सात जागा मागत आहेत, त्यात या जागेचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. महायुतीचा १२-०४-०१ हा फॉर्म्युला शिंदेसेनेला मान्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *