मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आरती साठे या दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या. एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या न्यायाधीश कशा होऊ शकतात, असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने २८ जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक झाली आहे. त्यात भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचेही नाव आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरती साठे यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, असे भाजपने म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारा प्रकार म्हटले आहे. अशा नियुक्त्या झाल्या तर लोक न्यायव्यवस्थेवर शंका घेऊ शकतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राजकीय प्रेरित विचारांच्या व्यक्तींना न्यायव्यवस्थेत आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास कायम राहावा, अशी विनंती विरोधकांनी केली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाली होती. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणांवरून प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. ६ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी भाजप प्राथमिक सदस्यता आणि कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदाचाही राजीनामा दिला.
Source link
New Thinking, New Style, Super Coverage