
Navi Mumbai Fire news: नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथील सेक्टर 36 मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत ही आग लागली होती. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे (Fire Birgade) जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याने ही आग लागली. आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीमधील रुम क्रमांक 301 मध्ये ही आग लागली होती. तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला.
सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगाने पसरली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन सदस्य बाहेर पडले. मात्र, आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडले होते. या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. या दोघी आत कशा अडकून राहिल्या, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ऐन दिवाळसणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे. (Navi Mumbai news)
Mumbai fire news: गोरेगावच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये भीषण आग
मुंबईतील गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिम पालिकेचा वॉर्ड ऑफिस शेजारी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये फटाक्यामुळे रात्री बारा वाजता ही आग लागली. या आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. मात्र, अग्निशमन दलाचे तातडीने घटनास्थळी दाखल होत तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, सरदार वल्लभभाई पटेल हॉल संपूर्ण जळून खाक झाला. फटाक्यामुळे आग कशी लागली यासंदर्भात अधिक तपास गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
Vasai Fire news: दिवाळीत हुल्लडबाजीचा अतिरेक; महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान
दिवाळी साजरी करताना काही तरुणांनी हुल्लडबाजीचा अतिरेक केला आहे. वसई रेल्वे स्टेशनजवळील फ्लॅट फॉर्म क्रमांक एकजवळ ही घटना घडली. रस्त्यावर फटाके फोडत असताना या तरुणांनी थेट वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक कचरा पेटीत सुतळी बॉम्ब टाकून झाकण बंद केले आणि त्यात स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे कचरा पेटीच्या झाकणाचे मोठे नुकसान झाले असून, सार्वजनिक मालमत्तेचा अपव्यय केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
घटनेचा व्हिडिओ एका सुज्ञ नागरिकाने आपल्या मोबाईलवर टिपला असून, तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन हुल्लडबाजांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आणखी वाचा
नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
आणखी वाचा