Headlines

निवडणुकांची घोषणा, काँग्रेस लागली कामाला, उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख सांगितली; कोण काय-काय म्हटलं?

निवडणुकांची घोषणा, काँग्रेस लागली कामाला, उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख सांगितली; कोण काय-काय म्हटलं?
निवडणुकांची घोषणा, काँग्रेस लागली कामाला, उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख सांगितली; कोण काय-काय म्हटलं?



Congress on Maharashtra Local Body Elections : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या घोषणेनंतर काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका केली आहे. सूर्य कुठे उगवतो इथपर्यंत पुरावे दिले तरी ते विचारात आहेत. फ्री आणि फेर निवडणूक घ्यायला हवे ही आयोगाकडे घटनात्मक जबाबदारी आहे, मात्र आयोग पळ काढत असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal)  यांनी व्यक्त केले. हे अराजकतेच्या खाईमध्ये घेऊन जात आहेत, जनता लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देईल असे सपकाळ म्हणाले.

येत्या 12 आणि 13 नोव्हेंबरला काँग्रेसची पार्लिमेंट्री बोर्डाची बैठक

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होताच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्याची तारीख देखील काँग्रेसने निश्चित केली आहे.  येत्या 12 आणि 13 नोव्हेंबरला काँग्रेसची पार्लिमेंट्री बोर्डाची बैठक झाली आहे. या बैठकीत केली नगर परिषद आणि नगरपंचायतला सामोरे जाणारे उमेदवारांच्या यादींची चर्चा आणि निवड केली जाणार आहे. याच दोन दिवसात पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली जाणारअसल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. 

अनुसूची 10 च्या अनुषंगाने फोडाफोडी करून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पळवला तसाच आता विरोधाभास आयोगही दाखवत आहे असे सपकाळ म्हणाले. आयोगाने संपूर्ण यादी तयार करायला हवी होती हा संपूर्ण कारभार 10 नंबरी असल्याचे सपकाळ म्हणाले. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेऊन संविधानिक पद्धतीने निवडणुकांना सामोरे जाऊ असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल : विश्वजीत कदम

लोकशाहीचे जतन या निवडणुकीत झाले पाहिजे असे विश्वजीत कदम म्हणाले. गेले अनेक वर्षांपासून अश्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. पण पद्धत असते की जेव्हा निवडणुका जाहीर करते तेव्हा पुरेसा कालावधी दिला जातो पण मी मोजले 21 ते 25 दिवसच दिले आहेत. लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ताकदीने निवडणुकीला सामोरे जाईल असे कदम म्हणाले. महायुतीचा कारभार पाहून महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी उभे राहील असेही कदम म्हणाले. दुबार मतदाराबाबत महविकास आघाडी आणि राहुल गांधी यांनी झोपलेल्या आयोगाला जागे करण्याचे काम झाले. यादीतील अनियमिता आम्ही मांडल्याचे कदम म्हणाले. या गोष्टीकडे आधी कानाडोळा केला गेला पण आता जनतेचा कौल ही महाविकास आघाडीसोबत असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले.

दुबार नावावर स्टार यावरुन वाज वाढण्याची शक्यता : सतेज पाटील

आमचे नशीब आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणून निवडणुका होत आहेत. जवळजवळ 10 ते 12 हजार लोकप्रतिनिधी यातून निवडून जातील. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला आता प्रतिनिधी येतील असे मत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. आमचे समाधान झाले असे आपण बोलू शकत नाही पण दुबार नावावर स्टार आणि मग एफिडेविट ही वाद वाढण्याची चिन्ह आहेत, यातून काय निष्पन्न होणार कसे होणार हे माहीत नाही असेही पाटील म्हणाले. दुबार नावांचे ऐक्सेप्टन्स त्यांनी केले आहे पण त्यावर कारवाई नाही. एखादा माणूस एका जागेवर मतदान करून दुसऱ्या जागेवर मतदान करू नये ही अपेक्षा आहे. 1 कोटीवरून अधिक मतदार आहेत. दुबार मतदार स्टार मारलेले मतदार किती याची आकडेवारी द्यायला हवी होती. डबल स्टार मारलेली यादी राजकीय पक्षाकडे द्यायला हवी आमची ही अपेक्षा आहे असे पाटील म्हणाले.

जिथे जिथे गरज असेल परिस्थिती असेल तिथे स्वबळावर : नसीम खान

जिथे जिथे गरज असेल परिस्थिती असेल तिथे स्वबळावर जिथे गरज असेल तिथे आघाडी सोबत जाणार असल्याचे मत काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केले. जी निवडणूक आयोगाकडे अपेक्षा होती, मतदार यादीबद्दल ते झाले नाही म्हणून निराशा आहे असे नसीम खान म्हणाले. आणखी जिल्हा परिषदेची तारीख आलेली नाही आमची तयारी आहे. लोकल बॉडी निवडणुकीच्या तयारीसाठी आज बैठक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था साठी आज बैठक झाली आहे. उद्यापासून जिल्हा पार्लिमेंट्री बोर्डची बैठक सुरू होईल 12 ते 13  तारखेला स्टेट पार्लिमेंट्री बोर्डची बैठक आहे. त्यावेळी 13 तारखेला पहिली यादी जाहीर करु असे त्या म्हणाल्या. पक्षाने आधीच निर्णय घेतला आहे की स्थानिक पातळीवर जिल्हाचे नेते निवडणूक घेतील. आमची तयारी नेहमी प्रत्येक वेळी स्थानिक स्वराज्य संस्था वेळी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे या निवडणुका स्वबळावर लढायचे. जिथे जिथे गरज असेल परिस्थिती असेल तिथे स्वबळावर जिथे गरज असेल तिथे आघाडी सोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *