Headlines

Jain Muni Pigeon Feeding Protest: अखेर जैन मुनींनी आमरण उपोषण घेतलं मागे, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकरांची मध्यस्थी फळाला, सरकारला 15 दिवसांची मुदत

Jain Muni Pigeon Feeding Protest: अखेर जैन मुनींनी आमरण उपोषण घेतलं मागे, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकरांची मध्यस्थी फळाला, सरकारला 15 दिवसांची मुदत
Jain Muni Pigeon Feeding Protest: अखेर जैन मुनींनी आमरण उपोषण घेतलं मागे, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकरांची मध्यस्थी फळाला, सरकारला 15 दिवसांची मुदत



Jain Muni Pigeon Feeding Protest: मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) यांनी दादर कबुतरखानासह (Dadar Kabutar Khana) इतर कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. जोपर्यंत शासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोवर अन्न आणि पाण्याचा त्याग करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भेट घेतली. चर्चेनंतर सरकारतर्फे 15 दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. शासनाच्या आश्वासनानंतर जैन मुनींनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे. मात्र “जर पंधरा दिवसांत सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, तर मी पुन्हा उपोषण सुरू करीन,” असा इशारा त्यांनी दिला आहे. आता 15 दिवसात सरकार काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले की, मंगलप्रभात लोढा हे जैन समाजाचे प्रतिनिधी आहे आणि राज्याचे मंत्री आहे. काल रात्री माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले. पण, मी असंतुष्ट होतो. आज राहुल नार्वेकर आले ते बोलले मार्ग काढू. आता समाजाच्या अनेक संघटना सोबत आल्या. पण, ते म्हटले की 15 दिवस वेळ द्या. त्यामुळे आम्ही 15 दिवस दिले आहेत. माझी मागणी पूर्ण झालेली नाही, असे त्यांनी म्हटले.  

Jain Muni Pigeon Feeding Protest: जैन मुनींच्या तीन मागण्या 

जैन मुनी निलेशचंद्र पुढे म्हणाले की, माझ्या तीन मागण्या आहेत. विलेपार्ले अंधेरी मंदिर तोडले, जैन बोर्डिंग तोडले, आम्हाला सनातन बोर्ड हवे आहे. मुस्लिम बोर्ड जसं तसेच हवे आहे.  गौरक्षक हल्ले थांबावे आणि आमचे 52 कबुतरखाने खुले करण्यात यावे. आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा शांतीप्रिय आंदोलन करू.  मी पालिकेच्या आणि न्यायालयाच्या दोन तासांच्या निर्णयावर संतुष्ट नाही. 

Jain Muni Pigeon Feeding Protest: तर पुन्हा आंदोलन करणार 

आम्हाला नवे कबूतरखाने नको. आम्हाला आमचे जुनेच कबुतरखाने हवे आहेत. ते कबूतर 1-2 किमी उडतील. त्यांनी 100 किमी दूर जागा दिल्या आहे. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. जैन समुदायासोबत जे जोडले गेले आहेत त्यांच्या हा आस्थेचा विषय आहे. आमच्या जैन समाजावर आजपर्यंत कोणताही अन्याय झाला नाही. आमच्या समाजात योगी आणि मोदी बसले आहे. योगी धर्म वाचवत आहेत. मोदी देश वाचवत आहेत. त्यामुळे अन्याय होणार नाही. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. 

आणखी वाचा 

Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *