
आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून नागपुरात वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केल्याचे समोर आले आहे…
या घटनेत 80 वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे.. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) ह्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे..
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर परिसरात काल ही घटना घडली..
हरणे दांपत्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने नागपूर बाहेर राहतो.. तर मुलगी विवाह झाल्यानंतर सासरी राहते.. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते..
घटनेनंतर घरी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे..