Headlines

Mumbai Crime news: मुंबईच्या काळाचौकीत शरीरसंबधांची क्लीप दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा जणांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले, आरोपीच्या गर्लफ्रेंडमुळे भयानक प्रकार उघड

Mumbai Crime news: मुंबईच्या काळाचौकीत शरीरसंबधांची क्लीप दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा जणांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले, आरोपीच्या गर्लफ्रेंडमुळे भयानक प्रकार उघड
Mumbai Crime news: मुंबईच्या काळाचौकीत शरीरसंबधांची क्लीप दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा जणांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले, आरोपीच्या गर्लफ्रेंडमुळे भयानक प्रकार उघड


Mumbai Crime news:  दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सहाण जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. सहा आरोपी अनेक दिवस या मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्या शरीराचे लचके तोडत होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape News) करणारे पाचही आरोपी हे अल्पवयीन आहेत. ही घटना समोर आल्यानंतर काळाचौकी परिसरात संबंधित आरोपींच्याविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला एका आरोपीने या मुलीचा एक अश्लील व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला वारंवार ब्लॅकमेल केले जात होते आणि तिच्यावर आरोपींकडून लैंगिक अत्याचार केले जात होते. मात्र, एका आरोपीच्या प्रेयसीमुळे हा सर्व प्रकार समोर आला.

अल्पवयीन असणारी ही पाचही मुले आळीपाळीने या मुलीचा शारीरिक उपभोग घ्यायची. यापैकी एका आरोपीच्या प्रेयसीला आपल्या प्रियकराचे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यामुळे तिने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आईकडे तक्रार केली. यानंतर पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी मुलीचे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. आईने मुलीला याबाबत अधिक खोलात जाऊन विचारल्यावर या मुलीने पाच जणांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे तिने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाचही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींचे मोबाइलही जप्त केले आहेत. हे मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता त्यामधून काय माहिती बाहेर येणार, हे बघावे लागेल. दरम्यान, पाचही आरोपींची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Crime news: नेमकं काय घडलं?

आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते. पीडित मुलगी 14 वर्षांची आहे. गेल्यावर्षी 1 ऑक्टोबर रोजी 17 वर्षांच्या आरोपीने या मुलीसोबत शारीरिक जवळीक साधली होती. त्याने तिला अटक करण्यात आलेल्या 27 वर्षीय आरोपीच्या घरी नेले. तेथे आरोपींनी या मुलीवर बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ आरोपींनी इतर काहीजणांना दिला. हा व्हिडीओ दाखवून इतर चार आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर अत्याचार केले. अल्पवयीन आरोपी 16 ते 17 वयोगटातील आहेत. त्यातील एक आरोपी 27 वर्षांचा असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी सतीश मुंडेला ठोकल्या बेड्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *