Headlines

Ramdas Kadam : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलत नाहीत? रामदास कदमांचा प्रश्न

Ramdas Kadam : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलत नाहीत? रामदास कदमांचा प्रश्न
Ramdas Kadam : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलत नाहीत? रामदास कदमांचा प्रश्न



मुंबई : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरीच ठेवला, त्यांच्या हातचे ठसे घेतल्याचा आरोपावर आपण कायम असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) म्हणाले. यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? त्यांचे चेलेचपाटे का बोलतात? अनिल परबांना ‘मातोश्री’चा हिस्सा मिळाला आहे का असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला. अनिल परबांनी (Anil Parab) रामदास कदमांवर आरोप केले होते. त्या आरोपांना रामदास कदमांनी उत्तर दिलं.

बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला नाईलाजाने मंत्रिपद दिलं. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण 2014 नंतर एकाही मेळाव्यात मला बोलू दिलं नाही असा आरोप रामदास कदमांनी केला.

Ramdas Kadam On Anil Parab : अनिल परब अर्धवट वकील

रामदास कदम म्हणाले की, मला वाटत अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन केले. मी ज्या डॉक्टरांचा उल्लेख केला होता, अनिल परब हे त्या डॉक्टरांवर देखील दावा करणार का? मी या प्रकरणी आतापर्यंत शांत होतो, आता मी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार आहे. तसे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिणार.

मी 50 वर्ष मातोश्रीवर काढली. या प्रकरणी स्वतः उद्धव ठाकरे यांनी बोलाव, चेले चपटे, चमचे यांनी बोलू नये असा टोला रामदास कदमांनी अनिल परबांना लगावला. चंद्रग्रहणाच्या रात्री 12 वाजता आपण वरळी येथील स्मशानभूमीत बकरा का कापला? त्यावेळी दोन नंगे बाबा होते, तुम्ही तिथे बकरा कापला का? असा प्रश्न रामदास कदम यांनी परबांना विचारला.

Ramdas Kadam On Wife : मी माझ्या पत्नीला वाचवलं होतं

रामदास कदम यांच्या पत्नीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. त्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, माझी उद्याही तयारी आहे आणि त्यांनी हे सिद्ध करावं. माझी पत्नी खेडला स्वयंपाक करत होती, तिथे असलेल्या दोन स्टोचा भडका उडाला. जेवण बनवताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली होत, माझ्या पत्नीला मीच वाचवलं होतं. हा मला असे बदनाम करतोय, याच्याविरोधात मी 100 टक्के न्यायालयात जाणार. आपल्या कोणत्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही, अनिल परब उगाच बदनामी करतोय.

Ramdas Kadam On Savali Bar : बार नव्हे तो ऑर्केस्ट्रा होता

सावली बार प्रकरणी केलेल्या अनिल परब यांच्या आरोपांवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, तो बार नव्हता, तो ऑर्केस्ट्रा होता. आमची मानहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्हाला कळलं की त्या ठिकाणी काम करणारी एक मुलगी विक्षिप्त हावभाव करतेय, तर आम्ही तो बंद केला.

Anil Parab Allegations On Ramdas Kadam : अनिल परबांचे रामदास कदमांवर आरोप

रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी त्यांना प्रतिआव्हान दिलं. नार्को टेस्ट कराच पण रामदास कदमांचीही नार्को टेस्ट करून पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं याची चौकशी करा असं परब म्हणाले. तसंच बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र आपल्याकडे आहे, आपणच त्या मृत्यूपत्राचे ट्रस्टी आहोत अशी माहिती परबांनी दिली. त्यामुळे अडचण असल्यास कोर्टात जा असं असं थेट आव्हान अनिल परबांनी दिलं. योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, मुख्यमंत्री अशा शिशुपालांना का वाचवत आहेत असा सवालही अनिल परबांनी केला.

1993 साली रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं याची चौकशी करावी अशी मागणी अनिल परबांनी केली. या प्रकरणात रामदास कदमांनी स्पष्टीकरण द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी, अन्यथा आम्ही साक्षीदार उभे करायला तयार आहोत, असा थेट इशारा परब यांनी दिला. तसंच रामदास कदमांच्या पुतण्याने आत्महत्या का केली त्याचा शोध घ्या, असा दावही त्यांनी केला. आमच्यालेखी रामदास कदमांची किंमत शून्य असल्याचं अनिल परब म्हणाले. रामदास कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असंही अनिल परबांनी सांगितलंय.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *