Headlines

Ramdas Kadam: स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली, या हातांनी तिला वाचवलं; रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर

Ramdas Kadam: स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली, या हातांनी तिला वाचवलं; रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर
Ramdas Kadam: स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली, या हातांनी तिला वाचवलं; रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर



Ramdas Kadam and Anil Parab: खेडमध्ये 1993 साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम या आगीत भाजल्या होत्या. त्यावेळी ज्योती कदम यांनी स्वत:ला पेटवून घेतले की त्यांना कोणीतरी पेटवून दिले, याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी रामदास कदम (Ramdas Kadam) यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब (Anil Parab) यांनी केली होती. या आरोपांना रामदास कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले नव्हते. तर स्टोव्हचा भडका उडाल्याने ती भाजली होती, असे रामदास कदम यांनी म्हटले.

अनिल परब यांनी जी मागणी आहे, त्याप्रमाणे माझी नार्को टेस्टची तयारी आहे. 1993 साली आमच्या खेडामधील घरी दोन स्टोव्ह होते. माझी पत्नी घरात स्वयंपाक करत होती तेव्हा तिच्या साडीचा पदर स्टोव्हमध्ये गेला आणि त्याने पेट घेतला आणि त्यानंतर स्टोव्हचा भडका उडाला. त्यावेळी मीच तिला वाचवले होते. तिला वाचवताना आगीत माझे दोन्ही हात भाजले होते. सहा महिने माझी पत्नी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात होती. मीदेखील सहा महिने तिकडेच होतो. आजही आम्ही नवरा-बायको जीवभावाने संसार करत आहोत. मात्र, अनिल परब यांनी आमची बदनामी केली. मी यासाठी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.

Anil Parab News: चंद्रग्रहणाच्या रात्री अनिल परब यांनी कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बळी दिला, रामदास कदमांचा आरोप

रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर काही आरोप केले. अनिल परब हे वकील आहेत, सुशिक्षित आहेत. पण चंद्रग्रहणाच्या रात्री त्यांनी वरळी कोळीवाड्यात रात्री 12 वाजता बकऱ्याचा बळी दिल्याचे सांगितले जाते. अनिल परब आणि एक बांधकाम व्यावसायिक स्मशानभूमीत आले होते. त्यांच्या गाडीत बकरा होता. त्यांच्यासोबत दोन तांत्रिकही आले होते. या तांत्रिकांनी माझे आणि योगेश कदम यांचे नाव घेऊन बकऱ्यांचा बळी दिला, असे स्मशानभूमीतील लोक सांगतात.मला याबद्दल खात्रीशीर आणि नेमकी माहिती नाही. तेथील लोकांनी मला ही गोष्ट सांगितली. पण अनिल परब यांनी खरोखरच हे अघोरी कृत्य केले असेल तर ते चूक आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.

Anil Parab slams Ramdas Kadam: अनिल परबांनी नेमके काय आरोप केले होते?

1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले.

आणखी वाचा

रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, अनिल परब यांचा हल्लाबोल

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *