Headlines

Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार

Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार



Rohit Arya Encounter: मुंबईमधील पवईतील आरके स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर (Rohit Arya Encounter) प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन करून रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र, केसरकर यांनी त्यावेळी रोहित आर्यशी बोलण्यास नकार दिला होता. या घटनेमुळे आता ते या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आणि घटनेपूर्वी काय संवाद झाला होता, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिस लवकरच त्यांचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत.

रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण न्यायालयात (Rohit Arya Encounter Case in Court)

दरम्यान, या एन्काउंटर प्रकरणात न्यायालयीन पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी पोलिसांवर बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्यची हत्या केल्याचा आरोप केला आहे. याचिकेत पुढे म्हटलं आहे की, या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करून गुन्हा दाखल करावा, तसेच तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. एन्काउंटरनंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने वळतो आणि न्यायालय त्यावर काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 केसरकरांच्या ट्विटर हँडलवर रोहित आर्यचे फोटो (Rohit Arya Encounter) 

दरम्यान, रोहितचा खात्मा झाल्यानंतर त्याने शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवल्याचे समोर आले. या उपक्रमातील  2 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने तो पैसे मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आंदोलन, उपोषणाचा सुद्धा मार्ग अवलंबला होता, अशी माहिती समोर आली. दुसरीकडे, रोहित आर्यसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत दिसत आहेत. यामध्ये व्यासपीठावर रोहित आर्य सुद्धा आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या ट्विटमध्ये दीपक केसरकर म्हणतात, शालेय शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा  मुख्यमंत्री ना. एकनाथजी  शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविण्यात आले असून हे विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *