Headlines

Shukra Gochar 2026: 1 ऑगस्ट रोजी शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश, शोभन योगामुळे महत्त्व वाढलं

Shukra Gochar 2026: 1 ऑगस्ट रोजी शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश, शोभन योगामुळे महत्त्व वाढलं
Shukra Gochar 2026: 1 ऑगस्ट रोजी शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश, शोभन योगामुळे महत्त्व वाढलं


Shukra Gochar 2026: 1 ऑगस्ट रोजी शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश, शोभन योगामुळे महत्त्व वाढलंImage Credit source: TV9 Network

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. प्रेम, सौंदर्य, कला, संपत्ती आणि भौतिक समृद्धीसाठी शुक्र ग्रहाची स्थिती पाहिली जाते. शुक्र हा कला, संगीत, सौंदर्य आणि सर्जनशीलतेशी संबंधित ग्रह आहे. जीवनशैली, आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी या ग्रहाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शुक्र ग्रहाचा गोचरही तितकाच प्रभावी मानला जातो. शुक्र ग्रहाने राशीबदल केला की त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती, सामाजिक जीवन आणि वैयक्तिक आकर्षणावर त्याचे परिणाम दिसून येतात. 1 ऑगस्ट 2026 रोजी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हे गोचर शोभन योगात होत असल्याने विशेष आहे. त्यामुळे या गोचराचं महत्त्व वाढलं आहे. चला जाणून घेऊयात शुक्र ग्रह कन्या राशीत कधी गोचर कले आणि शोभन योगाचं काय महत्त्व आहे ते…

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश

द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजून 33 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच 2 सप्टेंबर 2026 दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत या राशीत राहिल. म्हणजेच शुक्र ग्रह 32 दिवस कन्या राशीत राहील. गोचर कालावधीत एक शुभ योग जुळून आला आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजून 23 मिनिंटापर्यंत शोभन योग आहे. हा योग शुभ आणि सकारात्मक मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शोभन योग 24 शुभ योगांपैकी एक आहे. सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीनुसार गणना केल्या हा योग तयार होतो. शोभन या शब्दाचा अर्थच आकर्षक आणि मोहक असा होतो. . त्यामुळे शुक्राच्या गोचर कालावधीत हा योग महत्त्वाचा ठरणार आहे.

शुक्राच्या गोचरामुळे काय होईल?

कन्या रास ही कठोर परिश्रम आणि शिस्तीची मानली जाते. या गोचरामुळे फॅशन, सौंदर्य, कला, डिझाईन आणि मिडिया क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळू शकतात. या काळात अधिक क्षमतेने काम करण्याचं बळ मिळेल. नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ उत्तम ठरेल. शुक्र हा धन आणि समृद्धीचा कारक आहे. त्यामुळे या काळात काही राशींना त्याचा लाभ मिळेल. भविष्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. इतकंच काय तर अनावश्यक खर्चाला आळा बसेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *