Headlines

एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा

एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा



मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ (School) या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. 2025-26 मध्ये हे अभियान राबविण्यासाठी 86.63 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत (Mumbai) देण्यात आली. सन 2025-26 या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविताना या अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यावर्षीही अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) कार्यकाळात सुरू झालेली ही योजनाही बंद झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यानंतर, शासनाने सुधारित निकषांसह हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

यंदाच्या वर्षामध्ये सदर अभियान सुधारित निकषांसह राबविण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त (शिक्षण) यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने 2025-26 या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-3 अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत 29 ऑगस्ट 2025 रोजी शासनास प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 95 टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

2024-25 मध्ये देखील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-2 हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह 26 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये 29 जुलै 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आले. 18 नोव्हेंबर 20249 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पारितोषिकाची 73.82 कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर अभियानास 2023-24 प्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला. आता 2025-26 या वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सदर अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *