Headlines

Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल



Varun Sardesai on Ashish Shelar: महाविकास आघाडीने राज्यातील बोगस, दुबार मतदारांवरून निवडणूक आयोगाला घेरल्यानंतर भाजपकडून आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर आरोप केले. मुस्लीम दुबार तसेच बोगस मतदारांची नावे न घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलार यांनी आरोप करत फडणवीस यांनाच पप्पू ठरवल्याची खोचक टिप्पणी केली. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सादरीकरणानंतर फडणवीस यांनी त्यांचा पप्पू असा उल्लेख केला होता. यानंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

आडनाव ‘शहा’ आहे म्हणून खूपसला नाही?

वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादीवरून (Duplicate Voters in Bandra East) शेलारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, त्यांना यादीमध्ये केवळ धर्म का दिसला? सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, त्यांनी मतदारांचे आडनाव किंवा धर्म बघून आक्षेप घेतला नव्हता. त्यांनी आशिष शेलार यांना विचारले की, त्यांना वांदऱ्यातले मुस्लिम खुपसले पण शाह नावाचे खूपसले नाहीत का? ते म्हणाले की, मतदाराचे आडनाव ‘शाह’ आहे की कोण आहे, याची आम्हाला चिंता नाही; आमचं सरळ सोपं म्हणणं आहे की या चुका आहेत ते म्हणाले की, जिगर महेंद्र शहा या मतदाराचे नाव यादीत दोनवेळा नोंदवले गेले आहे. एकाच पानावर त्याचे दोन वेळा नाव आहे. त्या व्यक्तीचा फोटो पण सेम आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे, या एन्ट्रीमध्ये एकदा पुरुष आणि एकदा महिला असे लिंग दाखवले गेले आहे. सरदेसाईंनी विचारले की, आडनाव ‘शहा’ आहे म्हणून तुम्हाला हा दुबार मतदार खूपसला नाही का?

सरदेसाई यांनी पार्थिव शहा यांच्या नोंदीत असलेल्या त्रुटी दाखवल्या. ते म्हणाले की, एकाच मतदार यादीत जयेश चंद्राकणी शहा यांचे वय 67 (वडिलांचे नाव चंद्रकणी शहा) दाखवले आहे. आणि बाजूला अजून एक नाव पार्थिव चंद्रकणी शहा यांचे, ज्यांचे वय 38 दाखवले आहे (वडिलांचे नाव चंद्रकणी शहा). सरदेसाईंनी नमूद केले की, एकाच मतदारी यादीत अशा चुका प्रत्येक ठिकाणी आहेत, ज्यामुळे एकाच कुटुंबातील सदस्यांच्या वयात मोठा फरक (30 वर्षांचा) दाखवला गेला आहे. त्यांनी प्रश्न केला की, यांचे आडनाव शहा असल्यामुळे आशिष शेलार यांना ‘दुबार असेल तरी चालतील’ असे वाटते का.

यादीत फक्त मुस्लिमच नाहीत, तर अनेक पटेल (Patel) आणि अनेक शर्मा (Sharma) यांचीही दुबार नावे आहेत. तसेच, भाटी (Bhati) आडनावाच्या व्यक्तींचाही समावेश आहे. वरुण सरदेसाई यांनी दावा केला की, त्यांनी 260 मतदारयाद्यांचा अभ्यास (260 voter lists) केला आहे आणि ते पुराव्यांसहित बोलत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *