
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने, राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक (Mumbai) घेतली. या बैठकीत त्यांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त केला, काँट्रॅक्टरांची चांगलीच खरडपट्टी केल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल झालेल्या बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांवर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. पायाभूत सुविधांसंदर्भातील वॉररुम बैठकीत मुख्यमंत्र्यांचा हा रुद्रावतार दिसून आला.
कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर, कोण त्याला उभं करा? का उशीर झाला ते सांगा आणि आता काय करणार आहात ते सांगा? असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, बहोत स्लो काम चला रहा है, एैसा नही चलेगा. आयएम नॉट हॅप्पी विथ दीस, या स्पीडने मी हॅप्पी नाहीये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एकेक प्रकल्पाचा बारकाईने आढावा घेतला असून प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करा, पायाभूत सुविधा वॉररुमने सुद्धा दर तीन महिन्याने प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
5 ते 10 वर्षे प्रकल्प चालतात हे आम्हाला मान्य नाही
राज्यातील आणि एमएमआरडीच्या 21 प्रकल्पांसाठी आपण कम्प्लिशनची जी नियोजित तारीख दिलेली आहे, त्यातील जे प्रकल्प मागे पडले आहेत त्याच्या कंत्राटदारांनाही आपण बोलवलं होत. त्यावेळी, कंत्राटदारांनीही काही अडचणी मांडल्या आहेत, अधिकाऱ्यांना सांगून त्या अडचणी सोडवायला आपण सांगितलं आहे. 5 ते 10 वर्ष प्रोजेक्ट्स चालतात ते आम्हाला मान्य नाही, प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण झाले पाहिजेत असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदारांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, पायाभूत सुविधांच्या कामावर राज्यातील फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारचा कायम भर राहिला आहे. मुंबईतील विविध प्रकल्प असोत किंवा देशभरातील रस्ते, विकासाचे प्रकल्प असो भाजप सरकारने वेगाने हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मुंबईतील अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, नवी मुंबई विमानतळ असेल किंवा मुंबईतील मेट्रो प्रकल्प असतील गतीमानतेनं हे प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं आहे.
हेही वाचा
आणखी वाचा