Headlines

अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…

अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…
अजित डोभाल यांच्या अमेरिका गुप्त दाैऱ्याबद्दल हैराण करणारी माहिती, भारताने स्पष्ट…


गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसला. मात्र, अमेरिकेने अचानक मोठा युटर्न घेत जाहीर केले की, आम्ही भारतावरील मुळ 25 टक्के टॅरिफ कमी करत असून 18 टक्के टॅरिफ भारताला लावत आहोत. हेच नाही तर भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारही होतील. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने सतत अमेरिका भारताला धमकावत होती. फक्त धमकावतच नाही तर भारताला रशियाचे तेल धुण्याचे मशिनही म्हणण्यात आले. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, ही अमेरिकेची इच्छा होती. आता भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा दावा अमेरिकेने केला. काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापार करार चर्चा सुरू होती. आता व्यापार करार झाले असून तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की, हे व्यापार करार पूर्ण होतील, असे सांगितले जात आहे.

ज्यावेळी अमेरिका भारताला धमकावत होती, त्यावेळी चक्क अजित डोभाल हे भारतासाठी मैदानात उतरले होते आणि त्यांनी थेट अमेरिकेत जाऊन कानउघडणी केल्याचे सांगितले जाते. भारताबद्दल असे कोणतेही विधान सहन केले जाणार नसल्याचे अजित डोभाल यांनी स्पष्ट सांगितले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला होता. आता ब्लूमबर्गच्या रिपोर्टबद्दल भारतानेही खुलासा केला.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, भारत आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2025 मध्ये अजित डोभाल हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रूबियो यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी थेट त्यांना खडेबोल सुनावले होते.तुम्ही किंवा अमेरिकेचे कोणतेही अधिकारी भारताला धमकावू शकत नाहीत, असे डोभाल यांनी म्हटले होते.

यावर बोलताना आता परराष्ट्र मंत्रालयाने याला निराधार म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये खोटा दावा करण्यात आला. अशी कोणती बैठक झाली नव्हती किंवा अजित डोभाल यांचा अमेरिकेचा असा कोणता गुप्त दाैराही झाला नव्हता. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनंतर मोठी खळबळ उडाली होती. आता त्यावर भारताने स्पष्टीकरण दिल्याचे बघायला मिळतंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *