
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार 8.10 ला मुंबईहून VSR कंपनीच्या विमानाने बारामतीकडे निघाले. मात्र, 8.45 ला त्यांच्या विमानाची भीषण अपघात बारामती विमानतळाच्या शेजारी झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही पुढे आली. व्हिडीओ पुढे आल्यानंतरच स्पष्ट झाले की, हा अत्यंत भीषण अपघात आहे. अजित पवार यांच्यासह विमानातील कोणीही वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्ण पवार कुटुंब एकत्र आले. मात्र, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत, याबाबतची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आणि त्यावेळीच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. यादरम्यानच आता आमदार रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोप केली.
रोहित पवार काल मुंबईतील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याच्या संदर्भात पोहोचले होते. मात्र, तिथे एफआयआर नोंदवून घेतली नाही. आज ते बारामती पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, अजूनही तिथे त्यांची एफआयआर नोंदवून घेतली नाही. यादरम्यानच रोहित पवार यांनी काही आरोप केली असून अजित पवार यांच्या अपघातानंतर एफआयआर का नोंदवून घेतली जात नसल्याचा प्रश्न उपस्थित केला.
रोहित पवार यांनी म्हटले की, मी किंवा त्यांच्या पक्षातील नेते आपल्या स्तरावर लढत आहेत. दादांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एखादा व्यक्ती योग्य लढत असेल पवार साहेबांचा त्याला पाठिंबा असतो. एकनाथ शिंदे यांचे खासदारही याबाबत आवाज उठवतील. अजितदादादांचे कुटुंबीय त्यांच्यापरीने लढत आहे. सुनेत्रा वहिणीही लढत आहेत. सीआयडी प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे अनुभवी नेते आहेत.
त्यांनी आमच्यासोबत लढा दिला असता तर आम्हाला बरे वाटले असते. मात्र, त्यांचे दोनच खासदार आहेत आमचे जास्त खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे खासदार, आपचे खासदार याबाबत लोकसभेत आवाज उठवतील. त्यामुळे केंद्रीय उड्डाणमंत्री यांचा राजीनामा झाला पाहिजे. तो व्हायलाच हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, जय पवार यानेही ब्लॅक बॉक्सवर शंका उपस्थित केली.