Headlines

अमेरिका इराण युद्धाच्या झळा हिंद महासागरापर्यंत, थेट भारतातून इराणाच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला, 87 जणांचा मृत्यु तर..

अमेरिका इराण युद्धाच्या झळा हिंद महासागरापर्यंत, थेट भारतातून इराणाच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला, 87 जणांचा मृत्यु तर..
अमेरिका इराण युद्धाच्या झळा हिंद महासागरापर्यंत, थेट भारतातून इराणाच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला, 87 जणांचा मृत्यु तर..


इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्ष टोकाला पोहोचला. हे युद्ध आता फक्त दोन किंवा तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही तर अनेक देशांना या युद्धाची झळ बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच इराणकडून जगाचे टेन्शन वाढवण्यात आले. महत्वाचा समुद्र मार्ग इराणकडून बंद करण्याची घोषणा करण्यात आली. ज्याचा फटका अनेक देशांना बसत आहे. याच मार्गाने भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा होतो आणि तो सध्या पूर्णपणे बंद आहे. जर तिथे टॅंकर दिसले तर आम्ही त्याला आग लावू अशी धमकी इराणकडून देण्यात आल्याने कोणताही देश त्या मार्गाने वाहतूक करण्यास पुढे येत नाही. थोडक्यात काय तर वाहतूक ठप्प झाली. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. इराणकडूनही मोठे हल्ले केले जात आहेत. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये इराण थेट हल्ला करत आहेत.

इराण अमेरिका युद्धाची झळ आता हिंद महासागरापर्यंत येऊन पोहोचली आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ अमेरिकेने इराणची युद्ध नाैका उडवली. ही युद्ध नाैका भारतातून युद्धाचा सरावकडून इराणकडे निघाली होती. त्यादरम्यानच अमेरिकेने थेट हिंद महासागरातच या युद्ध नाैकेला उडवली, ज्याने मोठी खळबळ उडाली. अमेरिकेने अत्यंत भीषण मिसाईल हल्ला या युद्ध नाैकेवर केला.

नुकताच याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या हल्ल्यानंतर बोलताना श्रीलंकेकडून स्पष्ट करण्यात आले की, या हल्ल्यात जवळपास 87 लोकांचा मृत्यु झाला. माहितीच मिळताच श्रीलंकेकडून बचावकार्य राबवण्यात आले. सकाळी 5.30 वाजता युद्ध नाैकेकडून त्यांना धोक्याचा सिग्नल पाठवण्यात आला. हे जहाज श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत होते.

या जहाजेवर 180 लोक होते, त्यापैकी 32 लोकांना वाचवण्यात यश आले. 60 जण बेपत्ता आहेत. मिळालेली अधिकची माहिती अशी की, IRIS 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टनम यथे आयोजित इंटरनॅशनल प्ल्रीट रिव्यू 2026 नंतर परत निघाले होते. या अभ्यासात 19 विदेशी युद्धनाैकासह 85 जहाज सहभागी झाले होते. यादरम्यानच या जहाजावर हल्ला करण्यात आला. अमेरिकेने मान्य केले की, इराणी युद्ध नाैकेवर आम्हीच हल्ला केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *