Headlines

अमेरिकेचं ते छोटसं डिव्हाईस, ज्याच्या मदतीने इराणच्या भूमीतून पायलटचं केलं रेस्क्यू; इराणला पत्ताही लागला नाही!

अमेरिकेचं ते छोटसं डिव्हाईस, ज्याच्या मदतीने इराणच्या भूमीतून पायलटचं केलं रेस्क्यू; इराणला पत्ताही लागला नाही!
अमेरिकेचं ते छोटसं डिव्हाईस, ज्याच्या मदतीने इराणच्या भूमीतून पायलटचं केलं रेस्क्यू; इराणला पत्ताही लागला नाही!


इराण आणि अमेरिकेतील युद्ध आता नव्या वळणावर पोहोचले आहे. इराण अमेरिकेचे हल्ले परतवून लावत आहेत. एवढंच नव्हे तर इराणकडूनही अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले जातेय. नुकतेच इराणने अमेरिकेचे F-15E हे लढाऊ विमान हाणून पाडले. इराणने या विमानाला यशस्वीपणे लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेने विमानाच्या पायलटला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच अतिशय थरारकपणे हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. इराणने पाडलेल्या विमानातील पायलट सलग 48 तास लपून होता. तो इराणी सैनिकांच्या हाती लागला नाही. दरम्यान, त्याच्याकडे असलेल्या एका उपकरणामुळे त्याचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. हे उपकरण काय आहे? ते कसे काम करते? ते जाणून घेऊ या…

CSEL उपकरणामुळे वाचला पायलटचा जीव

इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यानंतर त्या विमानातील पायलटला पळ काढण्यात यश मिळाले. तो साधारण 48 तासांपासून इराणी सैनिकांपासून स्वत:ला वाचवत होता. याच काळात त्याच्याकडे एक कॉम्बॅट सर्व्हाईव्हर इव्हेडर लोकेटर (CSEL) नावाचे एक उपकरण होते. याच उपकरणाच्या माध्यमातून तो अमेरिकन लष्कराने त्याचे लोकेशन पाठवत होता. त्यानंतर त्यानंतर या पायलटचे अचूक लोकेशन शोधून अमेरिकन लष्कराने या पायलटला वाचवले.

हे उपकरण कसे काम करते?;

मिळालेल्या माहितीनुसार CSEL हे उपकरण तळहाताएवढ्या आकारचे असते. त्याचे वजन साधारण 800 ग्रॅम असते. हे उपकरण पायलटच्या सैनिकी पोषाखावर छातीवर लावले जाते. हे उपकरण एक छोटे कम्युनिकेशन कॉम्प्यूटर आहे. पाण्यामध्ये 10 मीटर खोलीपर्यंत हे उपकरण व्यवस्थित काम करू शकते. विशेष म्हणजे या उपकरणाची बॅटरी 21 दिवसांपर्यंत टिकते.

पायलटने स्वत:ला कसं वाचवलं? सिग्नल कसे पाठवले?

इराणने हल्ला केल्यानंतर विमान पडले मात्र तो पायलट मात्र इराणी लष्कराच्या हाती लागला नाही. त्याने लगेच स्वत:ला वाचत CSEL उपकरणाच्या मदतीने अमेरिकन लष्कराला लोकेशन पाठवले. हे उपकरण अत्यंत आधुनिक असल्याने इराणच्या वॉर सिस्टिममध्ये त्याच्या सिग्नलची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याच उपकरणाने पाठवलेल्या सिग्नलच्या मदतीने अमेरिकन लष्कराने त्या पायलटचा शोध घेतला आणि इराणकडून हल्ले केले जात असतानाही त्याला रेस्क्यू केले. दरम्यान, आता अमेरिका इराणवर मोठा हल्ला करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *