Headlines

अमेरिकेचा आणखी एका देशावर मोठा हल्ला, थेट सैन्य घुसवलं; इराण युद्ध चालू असतानाच आता नवं टेन्शन!

अमेरिकेचा आणखी एका देशावर मोठा हल्ला, थेट सैन्य घुसवलं; इराण युद्ध चालू असतानाच आता नवं टेन्शन!
अमेरिकेचा आणखी एका देशावर मोठा हल्ला, थेट सैन्य घुसवलं; इराण युद्ध चालू असतानाच आता नवं टेन्शन!


Iran Israel War : सध्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग हादरले आहे. कारण युद्ध सुरूच राहिले तर संपूर्ण जगात इंधनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इंधन, उर्जानिर्मिती महाग होऊ शकते. अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतल्याने तर परिस्थिती जास्तच गंभीर झालेली आहे. दरम्यान, एकीकडे अमेरिका इराणवर हल्ले करत असतानाच आता दुसरीकडे आणखी एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. अमेरिकेने आणखी एका देशावर मोठी कारवाई केली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक हल्ले केले आहेत. अजूनही हा संघर्ष चालूच आहे. असे असतानाच आता अमेरिकेने लॅटिन अमेरिकेत मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या यूएस साउथर्न कमांडने (SOUTHCOM) इक्वेडोर या देशात थेट हल्ला केला आहे. ही कारवाई तेथील डिझाईनेटेड टेरिरिस्ट ऑर्गनायझेशनविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यासाठी इक्वेडोरच्या सैन्यानेही मदत केली आहे. अमेरिका आणि इक्वेडोर यांनी संयुक्तपणे हा हल्ला घडवून आणला आहे. इक्वेडोरमध्ये ड्रग्जची वाढती तस्करी आणि या ड्रग्ज तस्करीतून समोर उभा ठाकलेला दहशतवाद संपवून टाकण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण अमेरिकेवर विशेष लक्ष

या कारवाईनंतर SOUTHCOM ने सोशल मीडियावर सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार 3 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. इक्वेडोर आणि अमेरिकन सैन्याने संयुक्तपणे ही कारवाी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताकाळात झालेल्या या हल्ल्याचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण अमेरिकेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे जात आहे. याआधी ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केले. त्यांच्यावर नार्कोटेरेरिझमचा आरोप आहे.

युद्ध लवकर संपुष्टात यावे

दरम्यान, आता अमेरिकेच्या या कारवाईनंतर पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे इराण-इस्रायल युद्धामुळे परिस्थिती जास्तच गंभीर झाली आहे. त्याचा परिणाम भारतावरही झालेला आहे. त्यामुळे भविष्यात हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *