
China Warns America : गेल्या अनेक दिवसांपासून देशाने अमेरिका आणि इराण यांच्या बिघडत चाललेल्या संबंधांचा धसका घेतला आहे. आम्ही कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकतो, असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. या हल्ल्यााठी लष्करदेखील पूर्ण ताकदीने तयार आहे. दुसरीकडे अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर आम्हीदेखील त्यांना जशास तसे उत्तर देऊ, आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा इराणकडून दिला जातोय. या देशांत युद्ध भडकले तर त्याचा परिणाम जगभरात होऊ शकतो. दरम्यान, आता अमेरिकेकडून इराणवर दबाव टाकला जात असतानाच चीनने अमेरिकेला थेट धमकावले आहे. या धमकीमुळे आता अमेरिकेची मोठी अडचण झाली आहे.
चीनकडे सर्वाधिक दुर्मिळ खनिजे
चीन टुडेने दिलेल्या वृत्तानुसार चीन हा देश इराणच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. चीनने उघडपणे इराणचे समर्थन केले आहे. अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेला दुर्मिळ खनिजे देणार नाही. दुर्मिळ खनिजांचा पुरवठा आम्ही लगेच थांबवू अशी थेट धमकीच चीनने अमेरिकेला देऊन टाकली आहे. या जगात चीनकडे सर्वाधिक दुर्मिळ खनिजे आहेत. अमेरिका चीनकडूनच ही खनिजे आयात करतो. अशा स्थितीत चीनने अमेरिकेला ही धमकी दिली आहे. चीनने प्रत्यक्षात या धमकीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली तर पुढच्या 48 तासांत अमेरिकेतील लष्कर सामग्रीसंबंधाचे उद्योग ठप्प पडतील, असे सांगितले जात आहे.
दुर्मिळ खनिजे अमेरिकेसाठी का महत्त्वाची?
अमेरिकेसाठी दुर्मिळ खनिजे खूपच महत्त्वाची आहेत. या दुर्मिळ खनिजांचा वापर शस्त्रांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. मिसाईल गाईडन्स सिस्टिम आणि फायटर जेटच्या इंजिनमध्ये या दुर्मिळ खनिजांचा वापर केला जातो. अमेरिकेत याच दुर्मिळ खनिजांचा वापर करून इलेक्ट्रिक चीप तयार केल्या जातात. अमेरिकेला लागणाऱ्या एकूण दुर्मिळ खनिजांपैकी साधारण 90 पुरवठा हा चीनकडून केला जातो.
चीन मध्ये का पडला?
चीनसाठी इराण हा देश खूप महत्त्वाचा आहे. कारण इराणकडून चीनला तेलाचा पुरवठा केला जातो. चीन इराणकडून प्रतिदिन 1.8 दशलक्ष बॅरलची खरेदी करतो. आकड्यांत सांगायचे झाल्यास इराणचे 80 टक्के तेल हे चीन खरेदी करतो. त्यामुळे चीनसाठी इराण हा महत्त्वाचा देश आहे. त्यामुळेच चीनने इराणला थेट धमकी दिली आहे.