Headlines

अमेरिकेने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप, गुप्त माहिती लीक केल्याचा….

अमेरिकेने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप, गुप्त माहिती लीक केल्याचा….
अमेरिकेने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप, गुप्त माहिती लीक केल्याचा….


इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने युद्ध छेडले आहे. इराण अण्वस्र निर्मिती करत असल्याचे कारण देऊन अमेरिका आणि इस्राईलने हा हल्ला केला आहे. युद्धाच्या १२ तासांच्या आतच इस्राईलने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची यांच्या हत्या केली आहे. त्यामुळे इराणविरोधात लवकरच युद्ध जिंकू असे अमेरिकेला वाटत होते. मात्र, इराणने चिवट प्रतिकार केला आहे. या इराणच्या युद्धास विरोध करत अमेरिकेचे अधिकारी जोसेफ उर्फ जोए केंट यांनी राजीनामा दिला होता. आता हे राजीनामा प्रकरण त्यांना महाग पडू शकते अशा घडोमोडी अमेरिकेत घडत आहेत.

इराणच्या युद्धाविरोधात राजीनामा देणे अमेरिकेचे अधिकारी जोसेफ ऊर्फ जोए केंट यांना भारी पडू शकते. कारण ट्रम्प प्रशासनाच्या काऊंटर टेरिझम डिपार्टमेंटचे प्रमुख असलेल्या जोए केंट यांच्या विरोधात चौकशी करण्यात येणार आहे. जोए यांच्यावर गुप्त माहिती लिक केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. चौकशीनंतर जोए यांना अटक देखली होऊ शकते. दुसरीकडे केंट यांनी केलेल्या नव्या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

प्रसिद्ध युट्यूबर टर्कर काल्सन यांना दिलेल्या मुलाखतीत जोए केंट यांनी म्हटले आहे की २०२५ मध्येही इराणकडे कोणताही अणूबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम नव्हते. २००४ नंतर इराणने आण्विक शस्रे बनवण्यासंदर्भात कोणतेही खास प्रयत्न केले नाहीत.

जोए केंट यांच्याविरोधात चौकशी सुरु

फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनने (FBI) जोए केंट यांच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या शिफारसीवर जोए यांच्या विरोधात चौकशी सुरु केली जात आहे. जोए यांच्यावर आरोप आहेत की युद्धादरम्यान त्यांनी गुप्त माहिती लिक केली, ज्यास अमेरिकेच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे म्हटले जात आहे असे वृत्त फॉक्स न्यूज चॅनलने दिले आहे.

अमेरिकेत गुप्त माहिती लिक करणे एक गंभीर गुन्हा मानला जात आहे. या आरोपावरुन US Espionage Act (1917) अंतर्गत दोषीवर कारवाई केली जाते. जर आरोपी दोषी आढळला तर त्याला १० ते २० वर्षांची शिक्षा दिली जाऊ शकते. या कायद्यात आजीवन जन्मठेपेची देखील तरतूद आहे.

केंट यांनी कोणते गुपित फोडले ?

1. जोए केंट यांनी राजीनामा देताना लिहिले की – इराणवर अमेरिकेने हल्ला केला असता तर त्याने अमेरिकेवर हल्ला केला असा ही माहिती चुकीची आहे. हे युद्ध चुकीचे आहे आणि या युद्धात मी नैतिकता म्हणून राजीनामा देत आहे.

2. केंट यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहीले की – हे युद्ध अमेरिकेचे युद्ध नाही. या युद्धास इस्राईल आणि तिच्या प्रभावशाली लॉबीच्या दबावामुळे सुरु केले आहे. याचे नुकसान अमेरिकेला होणार आहे. ही सत्य सांगण्याची वेळ आहे.

3.केंट यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे की इराणने २००४ मध्ये फतवा काढला होता की तेव्हा पासून तेहराण आण्विक शस्रे तयार करत नाही. हे म्हणणे असत्य आहे की इराण आण्विक शस्रास्रे तयार करत आहे आणि तो जगासाठी धोका बनू शकतो.

4. केंट यांनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर देखील सवाल केला होता. त्यांनी म्हटले होते ज्यास २०१६ मध्ये सुरु केले होते. आणि २०२४ मध्ये प्रचारात वापरले गेले. त्यास इराण युद्धात समाप्त करण्यात आले आहे. केंट यांचा रोख मागा ( मेक अमेरिका ग्रेट अमेरिका ) मोहिमेवर होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *