
इराण आणि अमेरिका युद्ध गंभीर स्थितीत आहे. अमेरिकेकडून मोठे हल्ले केले जाणार आहेत. यादरम्यानच इराणच्या नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता इराणचे नवे सर्वाेेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये एक बैठकीत खास पद्धतीने सहभागी होताना मोजतबा खोमेनेई दिसले. ज्या रूमध्ये मोजतबा खामेनेई गेले, त्या रूमध्ये मोठ्या स्क्रीनवर इस्त्रायलचे अणू ठिकाणे दिसत आहेत. यावेळी काही सैन्य अधिकारी देखील उपस्थित असल्याचे बघायला मिळाले. मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. ते बेशुद्ध असल्याचे सांगितले जात होते. यादरम्याच व्हिडीओ शेअर करण्यात आला. काही रिपोर्टमध्ये अजूनही मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. यूएस आणि इस्त्रायलच्या इंटेलिजेंसच्या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई यांची तब्येत अत्यंत खराब आहे.
या स्थितीत ते कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. मात्र, यावर इराणकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. एक अशीही चर्चा आहे की, युद्धात मनोवैज्ञानिक हल्ला करण्यासाठी मुद्दाम मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल अशाप्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. रिपोर्टच्या म्हणण्यांनुसार, मोजतबा खामेनेई यांची तब्येत खराब असून ते बेशुद्ध आहेत.
त्यांच्यावर कोम शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहे. गु्प्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई यांना लकवा मारला आहे. काही समजण्याचे आणि निर्णय घेण्याची त्यांची स्थिती नाहीये. पहिल्यांदाच इराणच्या सर्वाेच्च नेत्याची लोकेशन सांगण्यात आली. मात्र, एकीकडे हा रिपोर्ट आहे तर दुसरीकडे इराणकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मोजतबा खामेनेई व्यवस्थित दिसून आले.
इराण आणि अमेरिका युद्धासाठी पुढील काही तास अत्यंत महत्नाचे आहेत. कारण मोठे हल्ले होणार आहेत. यादरम्यानच इराण आपल्या काही मागण्यांवर ठाम आहे. इराणला युद्धबंदी करार प्रस्ताव देण्यात आला. मात्र, त्यांनी केराची टोपली दाखवली. इराणकडून काही मागण्या ठेवण्यात आल्या. अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर हल्ला करणार असतानाच मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे.