Headlines

अल्ट्रासाउंडमध्ये जुळे मुलं, पण प्रसूतीनंतर एकच बाळ मिळालं, दुसऱ्या बाळाबाबत समोर आलेली माहिती हैराण करणारी

अल्ट्रासाउंडमध्ये जुळे मुलं, पण प्रसूतीनंतर एकच बाळ मिळालं, दुसऱ्या बाळाबाबत समोर आलेली माहिती हैराण करणारी
अल्ट्रासाउंडमध्ये जुळे मुलं, पण प्रसूतीनंतर एकच बाळ मिळालं, दुसऱ्या बाळाबाबत समोर आलेली माहिती हैराण करणारी


Bihar News : बेगूसराय जिल्ह्यातील वीरपूर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी रुग्णालयात नवजात बाळ चोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीपूर चौक येथील आशा किरण स्वास्थ्य सेवा सदन या खासगी रुग्णालयात ही घटना घडल्याचा आरोप आहे. पीडित महिला ममता कुमारी हिने प्रसूतीनंतर आपल्याला जुळी मुले झाली होती. मात्र रुग्णालयाकडून केवळ एकच बाळ देण्यात आल्याचा दावा केला आहे.

पीडितेचा आरोप काय?

ममता कुमारी हिने दिलेल्या माहितीनुसार, ती दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर ती आपल्या माहेरी आली होती आणि वीरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या अल्ट्रासाउंडमध्ये तिच्या पोटात दोन बाळे असल्याचे सांगण्यात आले होते.

19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ती प्रथम सरकारी रुग्णालयात गेली. तेथील कर्मचाऱ्यांनी जुळ्या बाळांच्या प्रसूतीत धोका असल्याचे सांगत तिला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती आशा किरण स्वास्थ्य सेवा सदन येथे दाखल झाली.

ममता कुमारीचा आरोप आहे की, प्रसूतीदरम्यान तिने दोन बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयाकडून तिच्या आईला केवळ एकच मुलगी देण्यात आली. जेव्हा दोन बाळांचा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही तिने केला आहे.

नंतर फेब्रुवारी महिन्यात तिला माहिती मिळाली की तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन बाळांना जन्म दिला होता. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता संबंधित कर्मचारी फरार झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीचा संशयही व्यक्त केला जात आहे.

रुग्णालयाचा बचाव

या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाने मात्र सर्व दावे फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाचे व्यवस्थापक राजकुमार यांनी सांगितले की, ममता कुमारी प्रसूतीसाठी आली तेव्हा तिच्याकडे कोणतेही वैद्यकीय अहवाल नव्हते. प्रसूतीनंतर तीन महिन्यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने आरोप संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, प्रसूतीवेळी केवळ एकच बाळ जन्माला आले होते आणि ते कुटुंबीयांना दाखवण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वीरपूर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *