Headlines

आई-वडीलांच्या कष्टाचे पांग फेडले, नगरचे बापूसाहेब गायकवाड IPS, तर जळगावच्या मोहिनी जगताप IAS

आई-वडीलांच्या कष्टाचे पांग फेडले, नगरचे बापूसाहेब गायकवाड IPS, तर जळगावच्या मोहिनी जगताप IAS
आई-वडीलांच्या कष्टाचे पांग फेडले, नगरचे बापूसाहेब गायकवाड IPS, तर जळगावच्या मोहिनी जगताप IAS


देशाच्या प्रशासकीय सेवेत प्रवेश देणाऱ्या युपीएससीचे निकाल नुकतेच लागले आहेत. देशाचील सर्वात अवघड असणाऱ्या या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसत असतात त्यातील एका मोजकेच विद्यार्थी ही परीक्षा पास करतात.नगरच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेले बापूसाहेब गायकवाड देशात ५६१ वा क्रमांक मिळवत आयपीएस झाले आहेत. तर जळगाव मुक्ताई नगरच्या मोहिनी जाधव देशात ३२३ वी रँक मिळवून आयएएस झालेल्या आहेत. काय आहे यांची कहाणी ते वाचूयात…

बापूसाहेब गायकवाड यांची आई दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करायची तर वडील आधी ड्रायव्हर नंतर वॉचमन म्हणून काम करत होते. आपण अंगठे बहाद्दर आहोत,परंतू दोन्ही मुलांना शिकवून मोठा साहेब करायचे ठरवले होते. त्यामुळे आपला मुलगा जिद्दीने येथपर्यंत पोहचला असे बापूसाहेबाचे वडीलांनी सांगितले. अहिल्यानगर येथील छोट्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले बापूसाहेब गायकवाड घरात लावण्यासाठी डब्बे पोहोचवण्याचं काम करत होते.

बापूसाहेब गायकवाड यांनी  प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी आधी डिप्लोमा पूर्ण करून L&T सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली, मात्र मनात एकच ध्यास होता UPSC चा. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेत UPSC च्या तयारीला सुरुवात केली. पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे शिक्षणासाठी आले असेल तरी गावातील मित्रांशी अजून नाळ कायम असल्याचे बापूसाहेब यांनी सांगतले. माझे गावातील काही मित्र घरची परिस्थिती गरीब असल्याने शिक्षण सोडून हातभार लावत असताना माझ्या आई-वडीलांनी आम्हाला शिकवण्याचे ठरवले आणि स्वत: कष्ठ करत राहिले म्हणून हा दिवस पाहायला मिळाल्याचे त्यांनी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याशी बोलताना सांगितले.

झेडपीच्या शाळेत शिकलेल्या मुक्ताईनगरच्या मोहिनी जगताप या जिद्द आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करीत सनदी अधिकारी बनल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोहिनीने देशात ३२३ वी रँक मिळवून आयएएस पदाला गवसणी घातली आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.मोहिनीचा हा प्रवास सोपा नव्हता. तिचे वडील निवृत्त शिक्षक आहेत, तर आईने घराची ओढाताण होऊ नये आणि मुलांच्या शिक्षणाला जोड मिळावी, म्हणून वर्षानुवर्षे शिलाई मशीनवर काम करून कुटुंबाला आधार दिला.

आईच्या हाताला पडलेले फोड आणि वडिलांचे कष्ट पाहून मोहिनीने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, जे आज सत्यात उतरले आहे. मोहिनी यांचे शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई विद्यालयात झाले. ए. ई. स्कूलमध्ये अकरावी आणि बारावीचे शिक्षण झाले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करणाऱ्या मोहिनी हिने थेट यूपीएससी यश मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे. तुम्ही लॉयल रहा आणि अभ्यास करा तुम्हाला परिस्थिती साथ देतेच असा मंत्र मोहिनी यांनी तरुणांना दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *