Headlines

आधी जावयासोबत पळाली, आता जीजासोबत… बायकोच्या कारनाम्याने पहिला नवरा कोमात

आधी जावयासोबत पळाली, आता जीजासोबत… बायकोच्या कारनाम्याने पहिला नवरा कोमात
आधी जावयासोबत पळाली, आता जीजासोबत… बायकोच्या कारनाम्याने पहिला नवरा कोमात


अलीगडचं एक प्रकरण बरचं गाजलं होतं, अनेकांना ते आठवत असेल. आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत, म्हणजेच भावी जावयासोबत सासू, पळून गेली होती. तीच महिला आता पुन्हा चर्चेत आली आहे. जवळपास 10 महिने जावई राहुल याच्यासोबत, पती-पत्नीप्रमाणे राहिल्यानंतर आता तिने त्या तरूणाला अलविदा केलं आहे. त्याचं कारण म्हणजे ती महिला, ती सासू आता तिच्या जिजाजींसोबतच पळून गेली आणि जाता जाता लाखो रुपये आणि दागिनेही घेऊन पळाली. यामुळे वैतागलेला, त्रस्त झालेल्या राहुल याने अलीगडला जाऊन पोलिसांत तक्रार दिली. पण हे प्रकरण बिहारचंअसल्यातचं सांगत पोलिसांनी त्यावर कारवाई करण्यास नकार दिला. नात्यांचा हा गुंता आता वेगळ्याच वळणावर जाऊ पोहोचला आहे.

मुलीच्या लग्नापूर्वीच कहाणीत ट्विस्ट

ही संपूर्ण घटना एप्रिल 2025 मध्ये सुरू झाली होती. या महिलेचं लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. घर रंगवण्याचे काम सुरू होते, नातेवाईक येत होते आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पण लग्नाच्या फक्त 12 दिवस आधी असं काहीतरी अनपेक्षित घडलं. अचानक मुलीची आई म्हणजे सासू ही भावी जावयासोबत राहुलसोबत पळून गेली. असा आरोप करण्यात आला की ती लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली होती. अंदाजे पाच लाख रुपयांचे दागिने आणि साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम गायब आहे असाही दाव करण्यात आला. माझ्या आईने घरात 10 रुपयेही सोडले नाही, असं मुलगी म्हणाली होती.

मोबाईलवरून वाढली जवळीक

कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, त्या महिलेने, जावयाला राहुलला स्मार्टफोन दिला होता. हळूहळू त्यांच्यात संभाषण वाढले. सुरुवातीला ते लग्नाच्या तयारीबद्दल बोलत होते आणि नंतर त्यांचे फोन, बोलणं बरंच लांबू लागलं. जेव्हा मी लग्नाच्या तयारीसाठी घरी परतला तेव्हा मला आढळलं की माझी पत्नी आणि राहुल तब्बल 15-20 तास फोनवर बोलत होते, असा आरोप त्या महिलेच्या पतीने केला होता. सुरुवातीला मला हे सामान्य वाटले, परंतु नंतर संशय आला असंही त्याने पुढे नमूद केलं.

पळून कुठे गेले ?

अखेर हे प्रकरण चर्चेत आलं आणि पोलिस सक्रीय झाले. सासू-जावई पळून गेल्याने सगळेच हादरले. अखेर ते दोघे अलीगढ येथून कासगंजला , तिथून बिहारच्या मुझफ्फरपूरला पळून गेल्याची माहिती समोर आली. ते काही दिवस तिथे राहिले. त्यांनी नेपाळ सीमेवर जाण्याचा प्लॅनही आखला. राहुलने नंतर सांगितले की जेव्हा त्याने त्याचा मोबाईल फोन चालू केला तेव्हा दिसले की त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वत्र चर्चा पसरली. ते मुझफ्फरपूरहून बसने उत्तर प्रदेशला परतले आणि शेवटी दादों पोलिस ठाण्यात शरण आला.

पोलिस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान, सासूने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. तिने सांगितले की तिचा नवरा तिला मारहाण करायचा, तिचा अपमान करायचा आणि मद्यपान केल्यानंतर तिला घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचा. सासू म्हणाली की राहुल फोन करायचा तेव्हा कधी त्याची मुलगी बोलायची, तर कधी तीही बोलायची. यामुळे घरात संघर्ष वाढत गेला. आता तू राहुलसोबत पळून जा अस टोमणे तिच्या पतीने मारले. असंही ती म्हणाली. अखेर परिस्थिती असह्य झाली तेव्हा जे योग्य वाटले ते केलं, असंही ती म्हणाली. मी त्या महिलेला (होणारी सासू) आधीच ओळखत होतो आणि तिच्या आग्रहावरूनच तो तिच्यासोबत गेलो, असं राहूलने सांगितलं.

10 महिन्यानंतर नवं ट्विस्ट

दोघं सुमारे 10 महिने बिहारमध्ये राहिले. ते पत-पत्नीप्रमाणे रहायचे अशी माहिती समोर आली होती. मात्र आता ती महिला मला सोडून जिजाजींसोबत पळून गेली असा आरोप राहुलने केला. जाताना ती तिच्यासोबत दोन लाख रुपये रोख आणि काही दागिने घेऊन गेली, असंही त्याने सांगितलं. “मी तिच्यासाठी माझे घर सोडले, समाजाचा तिरस्कार सहन आणि आता ती मला सोडून गेली आहे,” असं म्हणताा तो खुप दु:खी दिसत होता.

यानंतर राहुलने अलिगड गाठले आणि दादो पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कथित घटना बिहारमध्ये घडली आहे, त्यामुळे तेथील पोलिस कारवाई करतील, असं पोलिसांनी सांगितलं. आता राहुल बिहारला जाऊन तक्रार दाखल करणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *