Headlines

आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया

आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया
आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया


गेली २४ दिवस इराणशी सुरु असलेल्या युद्धावर अमेरिकेने प्रथमच माघार घेतली आहे. इराणवरील हल्ल्यांना पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील इराणी दुतावासाने दावा केला आहे की इराणच्या कठोर इशाऱ्यानंतर अमेरिकेने त्यांच्या एनर्जी इन्फ्रास्ट्र्क्चरवरील हल्ल्याची योजना टाळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणने म्हटले आहे की आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिका घाबरला आणि त्यांनी त्यांची योजना बदलली.

दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. असा दावा केला जात आहे की इराणने स्पष्ट केले होती जर त्याच्या एनर्जी इफ्रास्ट्रक्चरवर हल्ला केला तर ते संपूर्ण ऊर्जा क्षेत्राच्या ढाच्याला लक्ष्य करतील.तसेच न्यूज एजन्सी एपीच्या बातमीनुसार इराणी सरकारी टेलिव्हीजनने म्हटले आहे की इराणच्या कठोर इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मागे हटले आहेत.

काय म्हणाले होते ट्रम्प ?

वास्तविक डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संदर्भात महत्वाचे वक्तव्य करताना सांगितले की त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला निर्देश दिले आहेत की इराणच्या वीज यंत्रणेला आणि ऊर्जा ढाच्यावर कोणत्याही संभावित सैनिक कारवाईला सध्या पाच दिवसांसाठी थांबवावे. हा निर्णय अमेरिका आणि इराणच्या दरम्यान गेल्या दोन दिवसात झालेल्या सकारात्मक आणि रचनात्मक बोलणी झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

येथे पोस्ट पाहा –

ट्रम्प यांनी यावेळी सांगितले की पुढील बोलणींवर पुढचे पाऊल काय घ्यायचे याचा निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे एकच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दात इशारा दिला होता की जर ४८ तासांत स्ट्रेट ऑफ होर्मुज पूर्णपणे उघडली नाही तर अमेरिका त्यांच्या ऊर्जा संसाधनांवर हल्ले करेल.

मात्र, अलिकडच्या या घटना क्रमांमुळे संकेत मिळत आहेत की दोन्ही देश तिखट वक्तव्ये करण्याच्या ऐवजी पुढे येऊन या युद्धावर व्यवहार्य तोडगा काढण्यावर पुढे येत आहेत. इराणच्या वृत्तसंस्था तसनीमने एका इराणी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की जोपर्यंत मनोवैज्ञानिक युद्ध जारी राहिल, तोपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मुज काही युद्धाच्या आधीच्या स्थितीत येणार नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *