Headlines

आयफोन 17 प्रो मॅक्सवर 23 हजार 100 रूपयांची थेट सूट, जाणून घ्या ‘या’ खास ऑफरबद्दल सविस्तर

आयफोन 17 प्रो मॅक्सवर 23 हजार 100 रूपयांची थेट सूट, जाणून घ्या ‘या’ खास ऑफरबद्दल सविस्तर
आयफोन 17 प्रो मॅक्सवर 23 हजार 100 रूपयांची थेट सूट, जाणून घ्या ‘या’ खास ऑफरबद्दल सविस्तर


आयफोन 17 प्रो मॅक्सवर 23 हजार 100 रूपयांची थेट आकर्षक सूट मिळत आहे. ज्यामुळे या फोनची लाँच किंमत 1 लाख 49 हजार 900 रूपयांवरून सवलतीनंतर अंदाजे 1 लाख 26 हजार 819 रूपये इतकी झाली आहे. तर ही खास ऑफर Zeptoवर उपलब्ध आहे, जिथे ग्राहक फास्ट डिलिव्हरी या पर्याय निवडून आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी करू शकतात. इतकेच नाही, तर ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’चा पर्यायही यात उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही फोनचा बॉक्स ओपन चेक करूनच तो खरेदी करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण विविध बँक कार्ड्सद्वारे अतिरिक्त सवलती नंतर हा फोन कोणत्या किंमतीत खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

आयफोन 17 प्रो मॅक्सवर केवळ सरळ सवलतच नाही, तर अनेक बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. HSBC, RBL, SBI आणि इंडसइंड यांसारख्या विविध बँक कार्ड्सद्वारे अतिरिक्त सवलती मिळवता येतील. काही बँकच्या सवलतीत या फोनची किंमत सुमारे 1,25,319 पर्यंतही पोहोचू शकते.

याव्यतिरिक्त जर तुम्हाला संपूर्ण रक्कम फोन खरेदी करताना भरायची नसेल तर दरमहा सुमारे 20 हजार 470 रूपयांपासून सुरू होणारे नो-कॉस्ट ईएमआय या उपलब्ध पर्याय निवडू शकता. त्यात ही सविधा अशा लोकांसाठी आहे ज्यांना हप्त्यांमध्ये प्रीमियम फोन खरेदी करायचा आहे.

आयफोन 17 प्रो मॅक्सबद्दल तपशील

आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 2868 x 1320 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला मोठा 6.9-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. यात ॲपलची नवीन A19 प्रो चिप आहे, ज्यामुळे फोन अत्यंत वेगवान आणि सुरळीत चालतो. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग करणे आणि मोठे ॲप्स चालवणे सोपे होते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात 48MP चा मागील कॅमेरा आणि 18MP चा पुढील कॅमेरा आहे, जो उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ गुणवत्ता देतो.

हा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि iOS 26 वर चालतो. यात 4,832mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 39 तासांपर्यंत टिकते असा दावा केला जातो. तसेच यात Wi-Fi 7, ब्लूटूथ v6, ड्युअल सिम (नॅनो + ई-सिम) आणि USB टाइप-C सारखी नवीनतम वैशिष्ट्ये देखील आहेत.

तुम्ही जर प्रीमियम आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही डील तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. नवीन आयफोन मॉडेल्सवर इतक्या मोठ्या सवलतीची सूट खूप कमी प्रमाणात मिळते. शिवाय बँक ऑफर्स आणि ईएमआयचे पर्याय याला आणखी खास बनवतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *