
तिचा हा लूक प्रचंड ट्रोल झाला. ट्रोलिंगनंतर तिने यावर स्पष्टीकरण दिले. तिच्या मते, हा आउटफिट तिची वैयक्तिक निवड नव्हती तर डिझायनरचा विचार होता. ती म्हणाली, ही रोहित वर्मा यांचे क्रिएशन आहे. त्यांच्या टॅलेंटवर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी हे डिझाइन विचारपूर्वक तयार केले असेल. एक कलाकार म्हणून मी त्यांच्या कामाचा आदर केला आणि आत्मविश्वासाने हा लूक कॅरी केला असं ती म्हणाली.