Headlines

इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…

इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…
इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…


अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले रोखल्याची घोषणा केली आहे. तसेच युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे, मात्र तरीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ला सुरूच आहेत. या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे कमी करण्यासाठी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता इराणने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीची ऑफर दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2019 पासून इराणकडून तेल खरेदी नाही

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, बिझनेल क्षेत्रातील 3 सूत्रांनी सांगितले की, इराणमधील व्यापाऱ्यांनी भारतीय रिफायनरी कंपन्यांना ICE ब्रेंटच्या तुलनेत प्रीमियम दराने इराणी तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा आणि वापरणारा देश आहे. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने 2019 नंतर इराणकडून तेल खरेदी बंद केली होती.

होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने संकट वाढले

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद झाली आहे, ज्यामुळे इंधन संकट अधिक तीव्र झाले आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा परिणाम म्हणजे तेलाच्या कमतरतेसोबतच भारतात एलपीजीचीही गंभीर टंचाई निर्माण झाली आहे.

तेल खरेदीबाबत सूत्रांनी काय म्हटले?

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील रिफायनरी कंपन्यांना इराणकडून एलपीजी आणि कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सुमारे एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेचे निर्बंध सैल झाल्यानंतर रिफायनऱ्यांनी लाखो बॅरल रशियन तेल आधीच खरेदी केले आहे. इराणी तेल ICE ब्रेंटपेक्षा प्रति बॅरल 6 ते 8 डॉलर प्रीमियम दराने ऑफर केले गेले आहे, ज्याचे पैसे माल पोहोचल्यानंतर सात दिवसांत द्यावे लागतील. व्यापारी आणि इराणी नॅशनल ऑइल कंपनी डॉलरमध्ये पेमेंटची मागणी करत आहेत, तर काहीजण भारतीय रुपयांत पेमेंट स्वीकारण्यासही तयार आहेत अशी माहितीही समोर आली आहे.

तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत

अमेरिकेने इराणी तेलावर निर्बंध लादले होते. मात्र ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी समुद्रात असलेल्या इराणी तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत जाहीर केली आहे. ही सवलत 20 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळेच इराणने भारताला ही तेल खरेदीची ऑफर दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *