Headlines

इराण बनवू शकतो जॅकेटवाला न्युक्लिअर बॉम्ब,अमेरिकेला आहे सर्वात मोठा धोका ?

इराण बनवू शकतो जॅकेटवाला न्युक्लिअर बॉम्ब,अमेरिकेला आहे सर्वात मोठा धोका ?
इराण बनवू शकतो जॅकेटवाला न्युक्लिअर बॉम्ब,अमेरिकेला आहे सर्वात मोठा धोका ?


इराण युद्धाला जवळपास महिना होत आला आहे. या युद्धाला संपवण्यासाठी आता अमेरिका निर्णायक हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. आता युद्धात इराण जॅकेटवाला न्युक्लिअर बॉम्ब बनवू शकतो अशी भिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी व्यक्त केली आहे. वेन्स यांचे म्हणणे आहे की इराण मोठ्या चलाखीने पुढे जात आहे. इराण असे शस्र बनवू इच्छीत आहे, ज्याने अमेरिकेत हाहाकार माजावा. इराण सुसाईड बॉम्बच्या धर्तीवर आता सुसाईड न्युक्लिअर बॉम्बर तयार करण्यात गुंतला आहे. यासाठी तो न्युक्लिअरवाला जॅकेट तयार करत असल्याची संशय जेडी वेन्स यांनी व्यक्त केला आहे.

इराण हा जॅकेटवाला न्युक्लिअर बॉम्ब सर्वात छोट्या अणुबॉम्बच्या ध्यानात घेऊन तयार केला जाऊन शकतो असे जेडी वेन्स यांनी म्हटले आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात छोटा अणूबॉम्ब आहे. ज्यात २३ किलोग्रॅम वॉरहेड वाहून नेले जाऊ शकते. याची एकूण क्षमता १० टन टीएनटी इतकी आहे.

जॅकेटवाल्या न्युक्लिअर बॉम्बची शंका का ?

इराणच्या IRGC समर्थित तस्नीम न्यूज एजन्सीने एका संपादकीय लेखात एनपीटीतून बाहेर पडण्याचे वक्तव्य केले आहे. तस्नीम न्यूज एजन्सीचे म्हणणे आहे की जेव्हा जगातील देश नियम कायदे पाळत नाहीत तर आपण काय पाळायचे ? NPT एक न्युक्लिअर बंदी कराराचा प्रस्ताव आहे.

इराणकडे ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित ४४० किलो युरेनियम आहे. एक आण्विक बॉम्ब बनवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत संवर्धित युरेनियमची गरज असते. ४४० किलो युरेनियमपासून ११ आण्विक शस्रे तयार केली जाऊ शकतात.

हा अमेरिकेसाठी का आहे धोका ?

1.इराणकडे सध्या असा कोणतेही जेट किंवा मिसाईल नाही जे अमेरिकपर्यंत पोहचू शकते. म्हणजे अण्वस्र तयार केल्यानंतरही इराण अमेरिकेवर हल्ला करु शकत नाही. दुसरीकडे जर इराणने जॅकेटवाले न्युक्लिअर बॉम्ब तयार केले तर त्याद्वारे तो अमेरिकेवर देखील हल्ला करु शकतो. त्यामुळेच अमेरिका या बॉम्बला घाबरुन आहे.

2. इराणच्या इस्लामिक गणराज्याशी संबंधिक स्लीपर सेल अमेरिकेतही एक्टीव्ह आहेत. सहजपणे हे स्लीपर सेल अमेरिकेत हाहाकार उडवू शकतात. अमेरिकेला ही भीती आहे की जर न्युक्लिअरवाले जॅकेट बॉम्ब तयार झाले तर इराणला रोखणे कठीण होऊ शकते. कारण, इराणचे स्लीपर सेल अमेरिकेत घुसण्यापासून रोखणे खूप अवघड काम आहे.

3. जॅकेटवाले न्युक्लिअर बॉम्बने जरी मोठ्या स्तरावर नुकसान होऊ शकत नसले तरी छोट्या-छोट्या पातळीवर याचा उपयोग घातक सिद्ध होऊ शकतो. जेडी वेन्स यांच्या मते जर एक साथ हजारो लोक मारले गेले तर शहरातील एक इलाका बर्बाद होऊ शकतो.यामुळे जगभरात हाहाकार माजू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *