Headlines

एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीनंतर शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीनंतर शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीनंतर शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न


एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शितल म्हात्रे यांनी “माझा भाऊ पळवला” असे ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला, तर मंत्री उदय सामंत यांनी “मैत्री अशी ठेवा की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे” असे स्टेटस ठेवून निशाणा साधला.

याचबरोबर खासदार नरेश मस्के यांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राज ठाकरेंनी शिंदे साहेबांना भेटल्याबद्दल टीका करणाऱ्यांना उद्देशून, “तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी लाचारी केलेली आहे, शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे,” असे मस्के म्हणाले. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी थेट प्रतिक्रिया टाळत, एकनाथ शिंदे यांच्या प्रवृत्तीविरुद्ध आमचे टोकाचे भांडण असल्याचे म्हटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *