Headlines

एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी
एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी


स्वयंघोषित ज्योतिषी, कॅप्टन म्हणवार भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील गुन्ह्यांची व्याप्ती आणि संख्या वाढतच चालली आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा, त्या घाणेरड्या कृत्याचं रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढंच नव्हे तर त्याने भविष्य सांगण्याचा दावा करत अनेकांची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाडल्याचंही उघड झालं असून त्याच्याविरोधा तक्रारींचा पाऊस पडत आहे. हे संपूर्ण प्रकरण फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशतही गाजत असून त्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा एसआयटीक़ून तपास सुरू असून रोज नवनवे कारनामे, माहिती समोर येत आहे.

याप्रकरणावर अनेक राजकारण्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली असून खुद्द सत्ताधारी भाजपचे नेतेही खरातवर संतापले आहेत. भाजपचे नेते सुधीरर मुनगंटीवार हे देखील चांगलेच भडकले असून खरात याला सुया टोचून मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला हेही योग्यचं झालं, असं वक्तव्य त्यांनी केला. एक दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्या, अशी ही मागणी त्यांनी केली.

खरातला सुया टोचून मारले पाहिजे मुनगंटीवारांचा संताप

अशा घटना घडतात, आरोप होतात तेव्हा कोणतीही चौकशी होऊ नये म्हणून राजीनाम्याची मागणी लोकं करतात, त्यात चूक काहीच नाही. संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं ते रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबद्दल बोलले. अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एकेक सुई टोचत, साऱ्या सुया टोचत टोच त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात येतं. त्याचंही कारण म्हणजे त्याने केलेली अघोरी कामं. किती वाईट कृत्य तक्याने केली आहेत. खरेतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी अशा नराधमांना चौकात उभे करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान खरातविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. विरोधी पक्षच नाही तर अनेक संघटनांनी त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली. शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख मनोहरराव भिडे यांनी सु्द्धा याप्रकरणात त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. भोंदू बाबा अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावं, असं वक्तव्य भिडे गुरूजींनी केलं होतं. तर भिडे गुरुजी आपण या , मी आपणास सोबत येतो. आपण दोघेही मिळून खरातला संपवू असे वक्तव्य बुलढाण्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलं. त्यांनी भिडे गुरूजींच्या वक्तव्याला एकप्रकारे पाठिंबा दिला होता.

रूपाली चाकणकर यांनी वर येण्याचा जो मार्ग वापरला होता तो मार्गच चुकीचा -अंजली दमानिया

अंजली दमानिया यांनीही रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर, खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. रूपाली चाकणकर यांनी वर येण्याचा जो मार्ग वापरला होता तो मार्गच चुकीचा होता वर नक्कीच माणसाने जावं पण स्वतःच्या कर्तुत्वावर जावं, असं त्या म्हणाल्या.जे जे दाबलंय प्रकरण तेथे बाहेर आलं पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे तेव्हाच खरा न्याय त्या महिलांना मिळेल, अशी मागणी दमानिया यांनी केली.

स्वतः म्हणाले आहेत हे की मी जर मोठी झाले तर ती अशोक खरातांमुळे झाले तर त्यांच्यासाठी काय काय करावे लागलं होतं ह्याच्यात आणि खरंतर खुलासा केला पाहिजे. कधी त्यांना पप्पा म्हणायच्या कधी त्यांना केक भरवायचे आहे सगळं बघून आणि कुठल्याही महिलेने अशा पद्धतीने ते गुरुस्थानी जरी मानलं तरी त्यांच्या मिस्टरांनी पाय धुतले असते तर ते योग्य होतं एका परपुरुषाच्या अशा पदराने पायपुसणं मला तरी खपत नाही आणि मला ते मान्य देखील होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *