Headlines

ओशनो जल… व्हायग्रा आणि राजकारण्यांचे हेलिकॉप्टर… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भंयकर घडायचं; दमानिया यांच्या आरोपाने खळबळ

ओशनो जल… व्हायग्रा आणि राजकारण्यांचे हेलिकॉप्टर… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भंयकर घडायचं; दमानिया यांच्या आरोपाने खळबळ
ओशनो जल… व्हायग्रा आणि राजकारण्यांचे हेलिकॉप्टर… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भंयकर घडायचं; दमानिया यांच्या आरोपाने खळबळ


महाराष्ट्राच्या राजकारणात एका नावामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे आणि ते नाव म्हणजे स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात.. भोंदूबाबा खरात याच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहे. अनेक राजकारणी व्यक्तींसोबत भोंदू बाबाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. तर रुपाली चाकणकर थर्ड क्लास बाई आहे… असं देखील दमानिया म्हणाल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दमानिया यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. तर जाणून घ्या काय म्हणाल्या दमानिया…

अंजली दमानिया म्हणाल्या, सगळ्याच माध्यमांकडून भोंदूबाबा खरातच्या अमुक गोष्टी दाखवल्या जात आहेत, पण माझी एक विनंती आहे. सर्वात आधी त्याला भोंदू बाबा म्हणणं बंद करा, त्याला विकृत बाबा असं नाव दिलं पाहिजे.. कारण भोंदू बाबा कोणाला म्हणतात, ज्याने लोकांची पैशांसाठी फसवणूक केली आहे. पैशांसाठी लोकांचा गैरफायदा घेतला आहे… अशा बाबांना भोंदू बाबा म्हणतात. पण या बाबाने तर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे… मली जी लोकं भेटायला आली आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार मी बोलत आहे.. अशा माणसाला भोंदू बाबा म्हणता येणार नाही, त्याला महाराष्ट्राचा विकृत बाबाच म्हटलं पाहिजे..

‘याप्रकरणी जमा केलेली माहिती मी दहावेळ तपासून पाहिली आहे आणि त्यानंतरच लोकांपुढे माडंली आहे… खरात एका प्रकारचं ओशनो जल बनवायचे त्यात व्हायग्रा टाकायचे आणि पाणी घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे.. यामध्ये असलेल्या तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टच्या एका व्यकीबद्दल देखली अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केला आहे.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, बाबा ओशने प्रे आणि सिद्ध प्रे असं काहीतरी करायचा, ज्यामध्ये 11 वेळी जप करायला सांगायचा… शंकराच्या पिंडीवरील हंडा हलायला लागला की, लोक त्याला प्रश्न विचारायचे. अशात सिद्घ प्रेमध्ये कोणाला सापाचा आवज ऐकू यायचा तर कोणाला आकृती दिसायची… श्रीमंत लोक तर पैसे देऊन जल घ्यायचे तर, मध्यम वर्गातील महिलांचं शोषण बाबा करायचा… मुंबईत कार्यरत असलेले एक मोठे अधिकारी जे डेप्युटी कलेक्टर आहेत, ते सुद्धा बाबाला पैसे पुरवायचे… कलेक्टर बरोबर खरात याचा एकत्रित व्यवसाय करायचे.. अशी माहिती देखील दमानिया यांनी दिली आहे.

शिर्डी येथे साई सिल्वर नावाचं एक मंगल कार्यालय आहे. त्यांच्याकडून सुद्धा या माणसाने सर्वकाही हडपलं आहे. एवढंच नाही तर, दोन तीन आत्महत्या प्रकरण दाबले आहेत. विकास दिवटे नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येचं प्रकरण पुन्हा ओपन करा, त्यानंतर किती नावे समोर येतात ते पाहा…

राजकारणी व्यक्तींबद्दल देखील अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘राजकारणावर आक्षेप आहेच पण महिला आयोगाच्या अध्यक्ष यांच्यावर देखील आक्षेप आहे. रुपाली चाकणकर थर्ड क्लास बाई आहे… खबरदार तुम्ही पांडुरंगच नाव काढलं तर… महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने तुमच्या विरोधात लढायला हजर राहिलं पाहिजे. 24 तासाच्या आत राजीनामा दिला नाही तर, महाराष्ट्रातील महिलांनी बाहेर यावं… महाराष्ट्रातील सगळ्या नेत्या महिलांना मी ठिय्या आंदोलनाचं आमंत्रण देईन…

सुनेत्रा पवार यांना पण विनंती करते… रुपाली चाकणकर यांना तत्काळ बडतर्फ करा असं आवाहन मी करते. मुख्यमंत्री आज काही बोलले नाही तर मी त्यांना गृह मंत्री , मुख्यमंत्री बोलणार नाही… काही व्हिडिओ बघितले अत्यंत घाण वाटली.. असं देखील अंजली दमानिया आता या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *