काँग्रेसची सत्ता असताना सपकाळ झोपले होते का? रामदास कदमांचा खोचक प्रश्न

काँग्रेसची सत्ता असताना सपकाळ झोपले होते का? रामदास कदमांचा खोचक प्रश्न
काँग्रेसची सत्ता असताना सपकाळ झोपले होते का? रामदास कदमांचा खोचक प्रश्न


रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या स्मारकाबाबत टीका केल्यानंतर, माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

कदम यांनी सपकाळ यांच्या टीकेला चिमपाट असे संबोधत, त्यांना प्रसिद्धीसाठी काहीही विचार न करता बोलणारे व्यक्ती म्हटले आहे. सपकाळ यांनी स्मारकाचे काम कधी होणार, असा प्रश्न विचारला होता. यावर रामदास कदम यांनी, “तुमच्या काँग्रेसची सत्ता आणि सरकार असताना तुम्ही झोपला होतात का? तेव्हा तुमचे हात आखडले होते की तुमच्याकडे निधी नव्हता?” असे बोचरे प्रश्न विचारून सपकाळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कदम यांच्या या प्रत्युत्तरानंतर या स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात या विषयावर काही पावले उचलली गेली नाहीत, याकडे रामदास कदम यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाभोवतीचे राजकारण अधिकच तापले असल्याचे दिसते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *