Headlines

काहीच खरं नाही… युद्धाचा भडका उडताच एका दिवसात तीनवेळा सोन्याचे भाव वाढले, पहिल्यांदाच घडलं, आता रेट काय?

काहीच खरं नाही… युद्धाचा भडका उडताच एका दिवसात तीनवेळा सोन्याचे भाव वाढले, पहिल्यांदाच घडलं, आता रेट काय?
काहीच खरं नाही… युद्धाचा भडका उडताच एका दिवसात तीनवेळा सोन्याचे भाव वाढले, पहिल्यांदाच घडलं, आता रेट काय?


इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्धाला सुरूवात झाली आहे. अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे जागतिक व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच आता या युद्धाच्या परिणामामुळे जळगावच्या सराफ बाजारात दिवसभरात तीन वेळा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्याचा सोन्याचा भाव काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोन्याच्या दरात एका दिवसात तिसऱ्यांदा वाढ

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल्याने सोन्याच्या दरात उसळी पहायला मिळत आहे. जळगावच्या सराफ बाजारात दिवसभरात तीन वेळा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज दिवसअखेर सोन्याच्या दरात 9 हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 73 हजार 40 रुपयांवर पोहोचला आहे. आज मार्केट उघडतात कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 6 हजार 500 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा तीन तासाने म्हणजेच दुपारी 3 वाजता सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतक पुन्हा दीड तासात म्हणजे दुपारी साडेचार वाजता सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची वाढ झाली.

सोन्याचा दर 1 लाख 73 हजारांवर

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवरही सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. याचाच परिणाम जळगावातील सराफा बाजारावर झाला आहे. आज दिवसभरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 9 हजारांची वाढ झाली असून सोने आता प्रति तोळा 1 लाख 73 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहे. आता हे युद्ध असेच सुरू राहिल्यास आगामी काळातही सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

(टीप- वरील लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *