
लग्नानंतर फक्त १० दिवसांतच परिस्थिती गंभीर झाली आहे. मोनालिसाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती आणि फरमान एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओत मोनालिसा घाबरलेल्या स्वरात म्हणते, “आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या आणि हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. हा व्हिडीओ आणि लेटर मी पोलीस, मुख्यमंत्री, कमिशनर आणि मीडियाला पाठवत आहे. प्लीज आम्हाला मदत करा!”