
सध्याच्या काळात जगभरात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जीव वाचवणे हे एक आव्हान ठरत आहे. कॅन्सरचे बहुतांश रुग्ण हे ॲलोपॅथीच्या उपचारांवर अवलंबून असतात. पण आता काहीव लोकं हे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटसाठी आयुर्वेदाकडेही वळत आहेत.कॅन्सरचेच्या उपचारादरम्यान सपोर्टिव्ह रोलमध्ये आयुर्वेद किती फायदेशीर ठरतं हे स्वामी रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे.
बाबा रामदेव सांगतात की, कॅन्सरच्या उपचारादरम्यान वैद्यकीय उपचार आवश्यक असले तरी, रुग्णाने त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना आजारातून बरे होण्यास मदत होते आणि कॅ्सरचे दुष्परिणाम कमी होतात. आयुर्वेदात काही गोष्टी आहेत ज्या सपोर्टिव्ह न्युट्रिशन मानल्या जातात, हा काही उपचारांऐवजी दुसरा पर्याय नाही, पण उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या घेतल्या जाऊ शकतात.
कॅन्सरच्या उपचारांत सपोर्टिव्ह डाएट गरजेचं का ?
स्वामी रामदेव सांगातात की, कॅन्सरच्या उपचारांमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी होते. त्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. अशा परिस्थितीत, आयुर्वेद हे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतो. अनेक रुग्णांना पचनाची समस्या, भूक न लागणे आणि अशक्तपणा वाटणं असा अनुभव येतो. अशावेळी, आयुर्वेदात काही अशा पदार्थांची शिफारस करण्यात आली आहे, जे कॅन्सरच्या उपचारादरम्यान फायदेशीर ठरू शकतात. हे पदार्थ खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील अशक्तपणा दूर होतो, असे अनेक फायदे होता.
आयुर्वेदातील कोणत्या गोष्टी फायदेशीर ?
आयुर्वेद आणि पोषण तज्ञांच्या मते, खाली नमूद केलेल हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करण्यास मदत करू शकतात :
ज्वारीचा रस
गिलॉयचा रस
डाळी आणि बीन्स
हिरव्या भाज्या
व्हीट ग्रास पावडर
कडुलिंबाचा रस
कोणते पदार्थ खाण टाळावं ?
साखर
तळलेले पदार्थ
रेड मीट किंवा लाल मांस
मीठाचे सेवन कमी करावे
डॉक्टरांचा सल्ला घ्या
आयुर्वेदात नमूद केलेले हे घटक म्हणजे काही कॅन्सरच्या उपचारांचा पर्याय नाहीत. ते फक्त सपोर्टिव्ह केअर म्हणून तुमच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. मात्र, त्यांचे सेवन करण्यापूर्वी, आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.