कोणी कट रचला होता का? याबाबतही तपास सुरू; अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीची माहिती

कोणी कट रचला होता का? याबाबतही तपास सुरू; अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीची माहिती
कोणी कट रचला होता का? याबाबतही तपास सुरू; अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीची माहिती

अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी सीआयडीचा तपास गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. या तपासामध्ये घातपात, गुन्हेगारी कट किंवा गुन्हेगारी निष्काळजीपणा, बेपर्वाईचे कृत्य, किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, या दिशेने तपास सुरू आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून, केंद्रीय एजन्सीज आणि तज्ज्ञांची मते घेतली जात आहेत. एआयबीचा अहवालही या तपासात महत्त्वाचा मानला जाईल.

सीआयडीच्या पथकामध्ये एसपी सीआयडी पुणे आणि एसपी सीआयडी नवी मुंबई हे तपास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीवर केलेल्या कारवाईबाबतही तपासात विचार केला जाईल. जर तपासात गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास, योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये खटला चालवला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *