Headlines

खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायलचा सर्वात मोठा निर्णय, नेतान्याहू यांच्या घोषणेनं जगाची झोप उडाली, आता सर्व काही संपणार

खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायलचा सर्वात मोठा निर्णय, नेतान्याहू यांच्या घोषणेनं जगाची झोप उडाली, आता सर्व काही संपणार
खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायलचा सर्वात मोठा निर्णय, नेतान्याहू यांच्या घोषणेनं जगाची झोप उडाली, आता सर्व काही संपणार


अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक मोठं मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सैन्यासोबतच अनेक सामान्य नागरिकांचे देखील मृत्यू झाले आहेत. इराणमधील एका शाळेवर बॉम्ब हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 50 पेक्षा अधिक मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई असलेल्या ठिकाणांना देखील इस्रायल आणि अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आले, या हल्ल्यांमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर अयातुल्लाह खामेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नात, आणि सून यांचा समावेश आहे. इराणच्या सरकारी मीडियाकडून खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दुसरीकडे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा जरी मृत्यू झाला असला तरी देखील इराणने आपली शस्त्रं खाली टाकलेली नाहीयेत, इराणकडून देखील इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणकडून इस्रायलसह ज्या देशांमध्ये अमेरिकेची नौदल तळं आहेत, त्या देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान अयातुल्लाह खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आपला एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले नेतान्याहू?

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर नेतान्याहू यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना आव्हान केलं आहे. आपल्या या व्हिडीओमध्ये खामेनेईचं सरकार हे दहशतवादी सरकार होतं असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे, की येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही या दहशतवादी सरकारच्या हजारो ठिकाणांवर हल्ले करून, सर्व उद्ध्वस्त करून टाकू असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे, दरम्यान नेतान्याहू यांच्या या धमकीनंतर आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *