Headlines

गालावर खळी पडणारे लोक स्वभावाने कसे असतात? 99 टक्के लोकांना असतात मोठे गैरसमज

गालावर खळी पडणारे लोक स्वभावाने कसे असतात? 99 टक्के लोकांना असतात मोठे गैरसमज
गालावर खळी पडणारे लोक स्वभावाने कसे असतात? 99 टक्के लोकांना असतात मोठे गैरसमज


एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील निखळ हसू हे त्याच्या सौंदर्यात भर घालतंच, पण जर हसताना गालावर गोड खळी (Dimple) पडत असेल, तर त्या सौंदर्याला चार चाँद लागतात. जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या गालावरील खळीमुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. मात्र, ही खळी केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसते. भारतीय समुद्रशास्त्र आणि मानवी स्वभाव अभ्यासकांच्या मते, गालावर खळी असणं हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल आणि नशिबाबद्दल बरेच काही सांगून जातं. या व्यक्ती नशीबवान का मानल्या जातात आणि त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात

समुद्रशास्त्रानुसार, ज्यांच्या गालावर खळी पडते, त्या व्यक्ती अत्यंत नशीबवान मानल्या जातात. अशा लोकांकडे एक प्रकारचे चुंबकीय व्यक्तिमत्व असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. त्यांना समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. त्यांच्या साध्या वागण्यानेही लोक प्रभावित होतात.

गालावर खळी पडणाऱ्या व्यक्ती मनातून खूप हळव्या आणि दयाळू असतात. इतरांचे दुःख पाहून त्या लगेच भावूक होतात. शक्य असेल तशी मदत करायला पुढे सरसावतात. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती खूप गंभीर असतात. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे आणि नात्यात पारदर्शकता ठेवणे त्यांना अधिक आवडते.

लोकांसाठी त्यांचे कुटुंब सर्वोच्च

आयुष्यात कितीही संकटे आली, तरी या व्यक्ती डगमगत नाहीत. चेहऱ्यावर हसू ठेवून कठीण परिस्थितीचा सामना करण्याची त्यांची जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. या लोकांसाठी त्यांचे कुटुंब सर्वोच्च असते. आई-वडील आणि भावंडांशी त्यांचे नाते खूप जिव्हाळ्याचे असते.

समुद्रशास्त्र हे खळीला भाग्याचे लक्षण मानते आणि त्या व्यक्तीला सौभाग्यवान ठरवते. तर विज्ञानानुसार, ही एक स्नायूंची स्थिती आहे. गालाच्या ‘झायगोमॅटिकस मेजर’ नावाच्या स्नायूची लांबी थोडी कमी असल्यामुळे किंवा तो विभागला गेल्यामुळे हसताना गालावर खळी पडते. हे प्रामुख्याने अनुवांशिक (Genetics) असते.

स्वभावानेही दिलखुलास आणि नशीबवान

थोडक्यात सांगायचे तर, गालावर पडणारी खळी ही केवळ दिसायलाच सुंदर नसते, तर ती तुमच्या आनंदी स्वभावाची ओळखही करून देते. विज्ञान याला स्नायूंची ठेवण मानत असले तरी समुद्रशास्त्रानुसार ही खळी पडणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात सुख आणि प्रेमाची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे, जर तुमच्या गालावरही खळी पडत असेल, तर तुम्ही स्वभावानेही दिलखुलास आणि नशीबवान आहात असे नक्कीच समजायला हवं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *