Headlines

चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!

चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!
चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!


China Japan : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात संपूर्ण जग होरपळत आहे. भारतातही मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. दुसरीकडे स्वयंपाकासाठी वापराला जाणार घरगुती गॅसही महागला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्येही मोठा वाद चालू असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या जपानमधील दूतावासावर हल्ला करण्यात आला असून त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

चीनच्या दूतावासात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि जपना या दोन्ही देशांमधील संबंध अगोदरपासून तणावाचे आहेत. असे असताना चीनच्या दूतावास कार्यालयावर एका व्यक्तीने नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती जास्तच चिंताजनक झाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर चीनने यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या जपानमधील दूतावासात मंगळवारी (24 मार्च) घुसखोरीचा हा प्रकार समोर आला. चीनच्या दूतावासात जी व्यक्ती घुसली होती. या घटनेत दूतावासातील कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झालेली नाही.

नेमका हल्ला कसा झाला होता?

जपानमधील चीनच्या दूतावासात घुसखोरी करून तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती जपानच्या ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सशी संबंधित असल्याचे सांगितले जातेय. ही बाब सत्य असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जपानला उत्तर देणे कठीण होऊ शकते. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला एक चाकूदेखील जप्त केला आहे. जपानने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी चीनने केली आहे. त्यामुळे चीन नेमकं काय करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *