
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. इराणसोबत मोठे युद्ध अमेरिकेचे भडकले आहे. या युद्धामुळे जग आजच्या घडीला संकटात आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. फक्त होर्मुज खाडीच नाही तर तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले करण्यात आली. जग ऊर्जेच्या एका वेगळ्या संकटात अडकले आहे. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून जगाचे टेन्शन वाढवले होते. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. युद्धामध्ये गुंतलेले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर फार काही लक्ष दिले नाही. पण आता युद्धात फार काही यश मिळत नसल्याने त्यांनी आता मोर्चा पुन्हा एकदा टॅरिफकडे वळवल्याचे बघायला मिळतंय.
नुकताच टॅरिफबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता पुन्हा एकदा व्यापार धोरणात बदल करण्यात आला. परदेशी ब्रँडेड औषधांवर 100% पर्यंत मोठा टॅरिफ लावण्याचे आदेश त्यांनी दिले. यामध्ये याचा मोठा फटका जगभरातील फॉर्मा कंपन्यांना बसणार आहे. मोठ्या प्रमाणात अमेरिकेत औषधे निर्यात होतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा डाव टाकत स्पष्ट केले की, कंपन्यांना फक्त औषधांवरील किमती कमी कराव्या लागणार नाही तर त्यांना अमेरिकेचे मार्केट हवे असेल तर त्यांनी त्याचे उत्पादनही येथेच करावे लागणार आहे. म्हणजेच एखाद्या कंपनीला अमेरिकेच्या मार्केटमध्ये औषधे विक्री करायची असतील तर त्याचे उत्पादन अमेरिकेत व्हायला पाहिजे.
जर बाहेर निर्यात केली जात असेल तर 100 टक्के टॅरिफ भरावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अनेक कंपन्या गोत्यात आल्या आहेत. भारतीय कंपन्यांवर मोठं संकट आलंय. भारतीय औषधांवर त्यांनी अगोदरच मोठा टॅरिफ लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धादरम्यानच पुन्हा एकदा टॅरिफ वॉर सुरू केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनावर थेटपणे परिणाम होईल.