जगाला मोठा हादरा! सहा बोटे… नेतन्याहू यांचा मृत्यू? इस्रायल सरकारची तातडीची प्रतिक्रिया; काय केला दावा?

जगाला मोठा हादरा! सहा बोटे… नेतन्याहू यांचा मृत्यू? इस्रायल सरकारची तातडीची प्रतिक्रिया; काय केला दावा?
जगाला मोठा हादरा! सहा बोटे… नेतन्याहू यांचा मृत्यू? इस्रायल सरकारची तातडीची प्रतिक्रिया; काय केला दावा?


इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाने जग हादरून गेलं आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी ठार झाले. त्यानंतर सर्वोच्च लीडर म्हणून निवडले गेलेले मोजतबा खामेनी हे गंभीर जखमी झाले. मोजतबा जिवंत आहे की मृत झाले याचा काहीच थंगपत्ता नाही. खामेनी यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे आलेले नाहीत. त्यामुळे जग हादरलेले असतानाच एक मोठी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असतानाच इस्रायल सरकारने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यातून जे समोर आलंय, त्याने जगाच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायलने मात्र, सोशल मीडियावरील हे दावे फेटाळून लावले आहेत. या सर्व फेक न्यूज आहे. पंतप्रधान नेतन्याहू स्वस्थ आहेत, असा दावा इस्रायल सरकारने केला आहे. त्यामुळे नेतन्याहू मारले गेल्याच्या वृत्ताला पूर्णविराम मिळाला आहे.

सहा बोटांमुळे…

नेतन्याहू यांनी शुक्रवारी एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ते युद्धावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका पत्रकार परिषदेला नेतन्याहू सामोरे जात असल्याचं दिसत आहे. नेतन्याहू यांची हत्या झाल्याची अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर यूजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या यूजर्सच्या दाव्यानुसार, पत्रकार परिषद सुरू असताना नेतन्याहू यांनी हात उंचावल्यावर त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. सहा बोटांच्या या व्हिडिओमुळेच नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याची अफवा उठल्याचं सांगितलं जात आहे.

नेतन्याहू कुठे आहेत?

नेतन्याहू मारले गेल्याच्या बातम्या जोरात सुरू असताना अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह कमेंटेटर Candace Owens यांनी एक्सवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी या मुद्द्यावर एक सवाल केला आहे. बिबी कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. नेतन्याहू यांना बिबी या टोपन नावाने ओळखले जाते. Candace म्हणाले की, नेतन्याहू यांच्या ऑफिसातून त्यांचा एआय जनरेटेड व्हिडिओ का व्हायरल करत आहे. त्यानंतर हा व्हिडिओ का डीलिट करण्यात आला आहे? आणि व्हाईट हाऊसमध्ये एवढी घबराट का पसरली आहे? दरम्यान, कमेंटेटर Candace Owens यांच्या या पोस्टनंतर तर नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा अधिकच पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *