Headlines

जबडा मोडलेला, सर्जरीसाठी घ्यावं लागलं 5 लाखांचा लोन; ‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकाचा खुलासा

जबडा मोडलेला, सर्जरीसाठी घ्यावं लागलं 5 लाखांचा लोन; ‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकाचा खुलासा
जबडा मोडलेला, सर्जरीसाठी घ्यावं लागलं 5 लाखांचा लोन; ‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकाचा खुलासा


‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकImage Credit source: Instagram

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक नुकताच सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ या वादग्रस्त शोमध्ये झळकला होता. या शोमध्ये अरमानने त्याच्या खरेपणाच्या आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली होती. याच शोमध्ये अमालने त्याच्या आजारपणाविषयीही खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या सर्जरीबद्दल सांगितलं आहे. अमाल मलिक हा गायक अरमान मलिकचा भाऊ आहे. तर प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक हे या दोघांचे काका आहेत. अमाल त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबत सर्व संबंध तोडले होते. याविषयी बोलताना तो बिग बॉसच्या घरात भावूक झाला होता.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अमाल म्हणाला, “माझे काही सर्जरी व्हायचे बाकी आहेत, माझ्या गुडघ्यातील एसीएल मोडला आहे. मी 19 वर्षांचा असताना माझा जबडा मोडला होता. माझ्या जबड्याजवळ जवळपास 45 टाके लागले आहेत. माझा उजवा खांदा डिसलोकेटेड असून माझा डावा हाथ फ्रॅक्चर झाला आहे. माझ्या नाकाचं हाडसुद्धा मोडलंय. मी टर्मिनेटरसारखाच आहे. तरीही दररोज उठून मी माझी सर्व कामं करतो. हीच माझी मानसिक ताकद आहे, जी मला पुढे घेऊन जाते.”

याविषयी अमाल पुढे म्हणाला, “आता हळूहळू मला या गोष्टींवर काम करायचं आहे. सुदैवाने गुडघ्याचे ब्रेसेस उत्तम असल्याने मला शोजमध्ये परफॉर्म करण्यास मदत होते. एक वेळ अशी होती जेव्हा माझा पूर्ण गुडघाच फिरायचा आणि आपल्या जागेवरून हटायचा. बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमधील परफॉर्मन्सदरम्यान हे झालं होतं. या शारीरिक गोष्टींवर मला खूप काम करायची गरज आहे. परंतु त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता माझ्याकडे वेळ नाही.”

अमालला त्याच्या चेहऱ्यावरील मॅक्सिलोफेशिअल सर्जरीसाठी 5 लाख रुपयांचा लोन घ्यावा लागला होता. या सर्व शारीरिक समस्या असतानाही अमालने त्याचं काम सुरूच ठेवलं होतं. याविषयी अमाल म्हणाला, “या सर्व समस्या असूनही मी काम केलं. बारावीच्या परीक्षेदरम्यान माझा पूर्ण चेहरा बिघडला होता. एका उपकरणाच्या मदतीने मी तीन-चार तास डोळे उघडून पेपर लिहिला होता. मी सर्व शारीरिक आणि भावनिक अडचणींना तोंड दिलं आहे. मी आता फक्त 35 वर्षांचा आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून मी या सर्व समस्यांना सामोरं जातोय.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *