Headlines

जर्मनीचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; अमेरिकेचं 40 हजार सैन्य देशातून बाहेर काढणार?

जर्मनीचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; अमेरिकेचं 40 हजार सैन्य देशातून बाहेर काढणार?
जर्मनीचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; अमेरिकेचं 40 हजार सैन्य देशातून बाहेर काढणार?


अमेरीका सध्या इराणसोबत युद्धात गुंतलेली आहे. या युद्धाची झळ जगातील जवळपास सर्वच देशांना बसत आहे. त्यामुळे अनेक देश अमेरिकेवर नाराज आहेत. विशेष म्हणजे नाटो देश आणि अमेरिकेचे काही खास मित्र देश देखील ट्रम्प यांच्यावर चांगलेच नाराज आहेत. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी आपल्या नाटो सहकारी देशांना स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करण्याचं आव्हान केलं होतं परंतु तेव्हा एकही देश त्यांच्या मदतील आला नाही. त्यानंतर आता जर्मनीमधून मोठी बातमी समोर येत आहे. जर्मनी आता अमेरिकेला मोठा दणका देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता जर्मनीमधून अमेरिकेविरोधात सूर उमटू लागले आहेत. सध्या अमेरिकेचे जर्मनीमध्ये 40 हजार सैनिक आहेत. हे सैनिक देशातून बाहेर काढावेत अशी मागणी जर्मनीच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून करण्यात आली आहे. एवढंच नाही तर अमेरिकेचे सर्व सैन्य बेस देखील देशातून काढून टाका अशी मागणी आता जर्मनीमधून होत आहे.

अल्टर्नेटिव फॉर जर्मनी नावाच्या पक्षाने जर्मनीच्या सरकारकडे ही मागणी केली आहे. आपल्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा प्रभाव नको, त्याची सुरुवात आता करायला हवी, अमेरिकेचे जर्मनीमधील सर्व सैन्य पुन्हा अमेरिकेत पाठवावं, तसेच जर्मनीमध्ये अमेरिकेची सैन्य तळं देखील ठेवू नयेत, अशी मागणी आता जर्मनीमधील काही पक्षांकडून होऊ लागली आहे, त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामध्ये देखील अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलला मोठा दणका बसला आहे. हुती बंडखोर आता युद्धाच्या मैदानात उतरले असून, त्यांनी इराणला पाठिंबा दिला आहे. हुती बंडखोरांनी यमनच्या राजधानीमधून थेट इस्त्रायलवर मिसाईल हल्ला केला आहे, त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. जर हुती बंडखोरांनी सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद केला तर संपूर्ण जगच मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यापूर्वीच इराणकडून स्ट्रीट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *