
टी20 वर्ल्डकप विजयानंतर हार्दिक पांड्याविरोधात पोलिसात तक्रार, झालं असं की…Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. क्रीडाप्रेमींनी नाचत गाजत आपला आनंद साजरा केला. आता चार दिवस झाले असून जेतेपदाचं उत्साह ओसरत चालला आहे. खेळाडूही आपआपल्या घरी परतले आहेत. पण असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. पुण्यातील एका वकिलांना हार्दिक पांड्या राष्ट्रीय ध्वजाचा आपमान केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदानंतर हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत वकील वाजिद खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, हार्दिक पांड्याने सामना संपल्यानंतर जल्लोष करताना राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला. पांड्याने एका स्टेजवर राष्ट्रीय ध्वज आपल्या शरीरावर गुंडाळून झोपला होता. त्याच्यासोबत माहिका शर्माही तिथे होती. तक्रार करण्याऱ्या वकिलांनी पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तक्रारकर्ते वाजिद खान यांच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणं ही प्रत्येकी जबाबदारी आहे आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली पाहीजे.
All the #T20WorldCup2026final scenes were adorable but Hardik Pandya doing PDA with GF were ewww pic.twitter.com/ohOaXRl5ib
— Godman Chikna (@Madan_Chikna) March 9, 2026
पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. पण तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. इतकंच काय तर तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. ही घटना अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर घडली होती. बक्षिसांचं वितरण झालं होतं. तर सर्व खेळाडू आपआपल्या कुटुंबियांसोबत मैदानावर विजयोत्सव साजरा करत होते. यावेळी हार्दिक पांड्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही होती. यावेळी हार्दिक पांड्याने तिची गळाभेट घेतली. तिला किसही केलं. तसेच सहकारी खेळाडूंसोबत डान्स करतानाही दिसला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि माहिका ट्रॉफी वितरण करण्यासाठी बांधलेल्या स्टेजवर बसले. यावेळी हार्दिकच्या अंगावर तिरंगा गुंडाळलेला होता. त्यानंतर काही सेकंद दोघेही पोडियमवर झोपले. आता या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.