मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नाराज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) अखेर नाराजी दूर करण्यात आली आहे. मनसेने मागणी केलेले स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने पाच प्रभाग समित्यांवर प्रत्येकी एक वर्ष मनसेचा अध्यक्ष राहील, ही मनसेची मागणी मान्य केली आहे. विशेष म्हणजे, ही अट लेखी स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.