
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या हवाई सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि पुराव्यानिशी मांडलेल्या मुद्द्यांमुळे DGCA (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) ला कारवाई करावी लागली. DGCA ने क्लियर जेट 40 45 मॉडेलच्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घातली आहे.
DGCA ने केलेल्या ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता आढळल्या. तसेच हवाई सुरक्षा नियमांचे योग्य प्रकारे पालन केले जात नसल्याचेही तपासणीत समोर आले आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर होते आणि ते प्रवाशांच्या जीवाशी संबंधित होते, हे या ऑडिटमधून स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतरही नियम न पाळता ही विमाने सेवेत होती. रोहित पवार यांनी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली असून, व्हीएसआरच्या मालकावर आणि संबंधित DGCA अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.