Headlines

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?


अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी इराणकडून देण्यात आली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांनी या भागात युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. मात्र कोणत्याही देशाकडून अमेरिकेला अद्याप सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. काही देशांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेला थेट विरोध केला आहे. त्यामुळे आता अमेरिकेची चिंता वाढली आहे. चीननेही ट्रम्प यांच्या या आवाहानावर आपली भूमिका मांडली आहे.

चीनने काय म्हटले?

चीनने होर्मुज सामुद्रधुनीत स्थिरता आणि सुरक्षा राखण्याचे महत्त्व अधोरेखित करताना या जलमार्गाला जागतिक व्यापार व ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले की, हा जलमार्ग आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सामायिक हिताचे आहे.

सर्व देशांनी सैनिकी कारवाई थांबवावी

चीनने सर्व देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे आणि परिस्थिती आणखी बिघडू नये याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. लिन जियान यांनी म्हटले की, ‘तात्काळ सर्व पक्षांनी सैनिकी कारवाई थांबवावी, तणाव वाढू नये याची काळजी घ्यावी आणि प्रादेशिक अस्थिरतेचा जागतिक आर्थिक विकासावर मोठा परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्यावे.’

अमेरिकेची चीनला धमकी

अमेरिका चीनवर दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांच्यात बैठक होणार आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. फायनांशियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संभाव्य शिखर बैठकीपूर्वी चीन मदत करणार का? हे मला जाणून घ्यायचे आहे. जर मला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर मी नियोजित चीन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *