Headlines

डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…

डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…
डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…


इराण आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला असून पुरवठा साखळी कमकुवत झाली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. खासकडून अनेक ठिकाणी एलपीजी गॅसचे संकट निर्माण झाले आहे. अशातच आता भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी मोठे विधान केले. ANI च्या अहवालानुसार, दुलत यांनी भारताचे इराणसोबत जुने आणि मजबूत संबंध असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण युद्ध जिंकू शकतो…

अमरजीत सिंह दुलत यांनी म्हटले की, ‘आपण नेहमीच इराणसोबत राहिलो आहोत आणि आपले संबंध खूप जुने आहेत. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात इराण विजय मिळवू शकतो.’ पुढे बोलताना दुलत यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींना दुर्दैवी म्हणत सध्या जे काही घडत आहे ते चिंताजनक असल्याचे विधान केले. मध्य पूर्वेत वाढत्या हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होताना दिसत आहे, यावेळी दुलत यांनी हे विधान केले आहे.

भारत आणि इराणचे संबंध

भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि इराण यांच्यातील संबंध काळानुसार मजबूत होत गेले. दोन्ही देशांनी औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर सहकार्य वाढवले. 1950 ते 1970 या काळात इराणचा कल अमेरिकेकडे होता. तरीही इराणने भारतासोबतचे संबंध कायम ठेवले. या काळात दोन्ही देशांमध्ये संतुलन आणि परस्पर समज दिसून आली.

1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, ज्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल झाला. त्यानंतरही भारताने संतुलित धोरण अवलंबले. भारताने एका बाजूला इराणसोबतचे संबंध टिकवून ठेवले आणि दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य देशांशीही संबंध कायम ठेवले. आधुनिक काळात भारत आणि इराणचे संबंध अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत झाले आहेत. ऊर्जा क्षेत्रात इराण भारतासाठी मोठा तेल पुरवठादार आहे, भारत मोठ्या प्रमाणावर इराणच्या तेलावर अवलंबून आहे.

चाबहार बंदराचे महत्त्व

चाबहार बंदर हे भारत आणि इराणमधील संबंधांतील एक महत्त्वाचा घटक आहे. भारत या बंदराच्या विकासात मदत करत आहे. यामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत थेट मार्ग मिळतो, ज्यामुळे पाकिस्तानलाही वळसा घालता येतो. व्यापार आणि संपर्कासाठी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका(INSTC) देखील अत्यंत महत्त्वाची आहे. हा एक असा प्रकल्प आहे जो इराण आणि रशिया यांना जोडतो आणि व्यापार सुलभ करतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *